मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पोलिसांच्या गाडीला ओव्हरटेक करून पळाले अन् पकडल्यावर सापडला 1 कोटींचा गांजा

पोलिसांच्या गाडीला ओव्हरटेक करून पळाले अन् पकडल्यावर सापडला 1 कोटींचा गांजा

पोलिसांना या चालकाचा संशय आला आणि त्यांनी त्या इनोव्हा गाडीचा पाठलाग सुरू केला.

पोलिसांना या चालकाचा संशय आला आणि त्यांनी त्या इनोव्हा गाडीचा पाठलाग सुरू केला.

पोलिसांना या चालकाचा संशय आला आणि त्यांनी त्या इनोव्हा गाडीचा पाठलाग सुरू केला.

सोलापूर, 19 डिसेंबर : थर्टी फस्ट सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी अंमली पदार्थाच्या तस्करीच्या घटना समोर येत आहे. सोलापूर शहरात विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीत गांजाची मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत शहर पोलिसांनी तब्बल 1 कोटी 24 लाखांचा गांजा (hemp) जप्त केला आहे. त्यामुळे सोलापूर पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

शनिवारी रात्रीच्या सुमारास विजापूर नाका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी गस्त घालत होते. कर्नाटककडून सोलापूर शहरात येणाऱ्या एका गाडीची झडती घेतल्यानंतर यात तब्बल एक कोटी २४ लाख किंमतीचा गांजा आढळून आला आहे. त्यामुळे सोलापूर शहर पोलीस दलाची ही मोठी कारवाई मानली जात आहे.

विजापूर नाका पोलीसांचे रात्र पथक आपल्या हद्दीत गस्तीचे काम सुरू होते. या पथकात पोलीस उपनिरीक्षक मुलाणी तसंच पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश राठोड हे गस्त घालत होते. त्यावेळी एका चारचाकी गाडीने पोलिसांच्या गाडीला ओव्हरटेक करत पुढे निघून गेली. त्यामुळे पोलिसांना या चालकाचा संशय आला आणि त्यांनी त्या इनोव्हा गाडीचा पाठलाग सुरू केला. त्यानंतर काही ठरावीक अंतरावर गेल्यानंतर पोलीस आपला पाठलाग करत असल्याचे तस्करांच्या लक्षात आले. त्यानंतर मात्र गाडीतील एकून तिघांपैकी दोघांनी पलायन केले. तेव्हा पोलिसांनी त्या वाहनचालकाची विचारपूस करून गाडीची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये गांजा असल्याची कबुली वाहन चालकाने दिली.

Year Ender 2021: कोरोनाकाळात बेरोजगारीत झाली प्रचंड वाढ; धक्कादायक आकडेवारी समोर

दरम्यान, इनोव्हा गाडीची झडती घेतल्यानंतर त्यात 623 किलो गांजा एका पोत्यात असल्याचे आढळून आले. आश्चर्याची बाब म्हणजे, या 623 किलो गांजाची रक्कम ही एक कोटी 24 लाख इतकी असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे ही मोठी कारवाई समोर आली आहे. या कारवाईनंतर अलीकडच्या काळातील गांजाबाबत केलेली सोलापूर पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. यापुर्वी ग्रामीण पोलीसांनी गांजा तस्करीची कारवाई केलेली आहे मात्र शहर पोलिसांकडून झालेली ही जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे.

First published:
top videos