मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Solapur Heart Attack case : अरे बापरे! 9 वर्षांच्या मुलीला हार्टअटॅक, सोलापूरच्या अवनीची अंगावर काटा आणणारी कहाणी

Solapur Heart Attack case : अरे बापरे! 9 वर्षांच्या मुलीला हार्टअटॅक, सोलापूरच्या अवनीची अंगावर काटा आणणारी कहाणी

अवघ्या 9 वर्षांच्या मुलीला ह्रदयविकाराचा झटका येऊन कोसळली आहे. सोलापूर जिल्ह्याती अवघ्या 9 वर्षांच्या अवनीचे हर्ट 65 वर्षांच्या व्यक्तीसारखं कमकुवत बनलं होतं.

अवघ्या 9 वर्षांच्या मुलीला ह्रदयविकाराचा झटका येऊन कोसळली आहे. सोलापूर जिल्ह्याती अवघ्या 9 वर्षांच्या अवनीचे हर्ट 65 वर्षांच्या व्यक्तीसारखं कमकुवत बनलं होतं.

अवघ्या 9 वर्षांच्या मुलीला ह्रदयविकाराचा झटका येऊन कोसळली आहे. सोलापूर जिल्ह्याती अवघ्या 9 वर्षांच्या अवनीचे हर्ट 65 वर्षांच्या व्यक्तीसारखं कमकुवत बनलं होतं.

  मुंबई, 16 ऑगस्ट : आतापर्यंत तुम्ही वयस्कर लोकांना हार्ट अटॅक आल्याचे ऐकलं असेल पण सोलापूरात एक अजब प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेबाबात डॉक्टरांनाही धक्क बसला आहे. अवघ्या 9 वर्षांच्या मुलीला ह्रदयविकाराचा झटका येऊन कोसळली आहे. सोलापूर जिल्ह्याती अवघ्या 9 वर्षांच्या अवनीचे हर्ट 65 वर्षांच्या व्यक्तीसारखं कमकुवत बनलं होतं. ती खेळत असताना खाली पडल्यानंतर तिच्या आई वडिलांनी रुग्णालयात नेल्यावर हा सगळा प्रकार समोर आला आहे. (Solapur Heart Attack case)

  मिड डेने दिलेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या अवनीला वयाच्या 9 व्या वर्षी अचानक हर्ट अटॅक आला. दरम्यान तिला तातडीने मुंबईच्या एका मोठ्या रुग्णलयात हलवण्यात आलं तिच्यावर बायपास सर्जरी करण्यात आली. अवनीच्या वडिलांनी याबाबत अधिक माहिती दिली ते म्हणाले कि, अवनी नेहमीप्रमाणे खेळत होती. खेळता खेळता अचानक तिच्या छातीत दुखू लागलं. छातीत जोरात कळ आली म्हणून आम्ही अवनीला सोबत घेऊन आणि दवाखाना गाठला. डॉक्टरांना दाखवलं.

  हे ही वाचा : Siddharth Jadhav : आठवडाभर हॉस्पिटलमध्ये अँडमीट होता अभिनेता सिद्धार्थ जाधव; पोस्ट शेअर करत दिली माहिती

  डॉक्टरांनी काही टेस्ट केल्या. या टेस्टमध्ये अवनीची कोलेस्ट्रॉल लेव्हल तपासण्यात आली यामध्ये तिची टेस्ट अत्यंत हाय दाखवली. वयाच्या 65व्या वर्षी एखाद्या व्यक्तीची कोलेस्ट्रॉल लेव्हल जी असते, तशी अवनीची होती. तिचं हृदय वयोवृद्ध माणसाइतकं कमकुवत झालं होतं. डॉक्टरदेखील ही बाब पाहून चक्रावून गेले होते. यानंतर वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्यांमधून निदान होतं गेलं. आणि अखेर अवनीला नेमकं काय झालंय, ही बाब समोर आल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिली.

  अवनीवर उपचार केलेले डॉक्टर शिवप्रकाश कृष्णनाईक म्हणाले कि, अवनीला हायपकोलेस्ट्रोलमिआ आहे. यामुळे अवनीची कोलेस्ट्रोल पातळी वाढते आणि त्यामुळे तिला हार्टअटॅकचा मोठा धोका संभवतो. छातीमधील दुखण्याचं नेमकं कारणंही हेच होतं, असे डॉक्टर कृष्णनाईक म्हणाले. जिथे नॉर्मल कोलेस्ट्रॉल लेव्हल 150 ते 200 mg/dl इतकं असायला हवं, तेच अवनीच्या बाबती 600 पेक्षा जास्त असल्याचे डॉक्टर कृष्णनाईक म्हणाले.

  हे ही वाचा : Health Tips : प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी खा ही भाजी, स्त्री-पुरुष दोघांचा वाढेल स्टॅमिना

  मी माझ्या 30 वर्षांच्या करीअर पहिल्यांच अशी केस हाताळतोय. अवनीला झालेला हा आजार जेनेटीक असण्याची जास्त शक्यता असल्याचंही ते म्हणाले. पण लहान मुलांमध्ये एका वृद्ध व्यक्तीसारखं हृदय आढळून आल्याचं मी याआधी कधीच पाहिलं नसल्याचे त्यांनी सांगितले.

  अवनीवर बायपास सर्जरी झाली. सर्जरी यशस्वी झाली. आता अवनीच्या प्रकृतीत सुधारणा होतेय. ती पुन्हा नेहमीसारखं हसू, खेळू आणि बागडू शकतेय. पण आता तिला आयुष्यभर औषधांचा आधार घ्यावा लागणार आहे. कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवावं लागणार आहे. ही घटना समोर आल्यानंतर डॉक्टरांनीही छातीमधील दुखण्याकडे दुर्लक्ष करणं जीवघेणं ठरु शकतं, असं म्हटलंय. अन्यथा हार्टअटॅक येऊन मृत्यू होण्याचा धोका असतो, असं जाणकार सांगतात. त्यामुळे वेळीच वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घेणं नितांत गरजेचं आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Heart Attack, Heart risk, Solapur, Solapur (City/Town/Village), Solapur news

  पुढील बातम्या