Home /News /maharashtra /

एका रात्रीत कुटुंब उद्धवस्त; सर्पदंश झाल्यानं 2 चिमुकल्यांनी सोडला प्राण, आईची मृत्यूशी झुंज

एका रात्रीत कुटुंब उद्धवस्त; सर्पदंश झाल्यानं 2 चिमुकल्यांनी सोडला प्राण, आईची मृत्यूशी झुंज

एकाच कुटुंबातील तिघांना सापानं दंश केला आहे. (File Photo)

एकाच कुटुंबातील तिघांना सापानं दंश केला आहे. (File Photo)

बीड, 08 सप्टेंबर: घरातील सर्व कुटुंब रात्री झोपी गेलं असताना एका सापानं कुटुंबातील तिघांना सर्पदंश (Snake bite 3 member of same family) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील सर्वजण झोपले असताना विषारी नागानं घरात प्रवेश करत 2 चिमुकल्या मुलींसह तिच्या आईला सर्पदंश केला आहे. या दुर्दैवी घटनेत दोन चिमुकल्या मुलींनी तडफडून आपला प्राण सोडला आहे. तर आईची मृत्यूशी झुंज सुरू असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही दुर्दैवी घटना उघडकीस येताच, गावात एकच खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील तिघांना सर्पदंश झाल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित घटना बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील सोनसांगवी येथे घडली आहे. स्वप्नाली दीपक साखरे (वय-4 ) आणि स्वीटी दीपक साखरे (वय-3) अशी मृत पावलेल्या चिमुकल्यांची नावं आहेत. तर आई जयश्री दीपक साखरे (वय-30) या मृत्यूशी झुंज देत असून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. हेही वाचा-VIDEO : घरात शिरत होता विषारी साप; पुढे महिलेनं जे केलं ते पाहून कौतुकाचा वर्षाव नेमकं काय घडलं? दीपक साखरे हे आपल्या पत्नी आणि दोन मुलींसोबत केज तालुक्यातील सोनेसांगवी येथील रहिवासी आहे. दीपक साखरे यांनी मंगळवारी रात्री आपल्या कुटुंबीयासोबत जेवण केलं. त्यानंतर रात्री पत्नी जयश्री साखरे यांच्यासह त्यांच्या 3 व 4 वर्षाच्या दोन मुली असं संपूर्ण कुटुंब झोपी गेलं होतं. परंतु रात्री 11 ते 12 च्या दरम्यान दीपक यांच्या पत्नी जयश्री आणि त्यांच्या दोन मुलींना सर्पदंश झाल्याचं निदर्शनास आलं. हेही वाचा-शिवसेना नेत्याच्या बंगल्यात बिबट्याचा वावर; घुसखोरी करत कुत्र्याला केलं भक्ष्य या घटनेनंतर तिघींनाही अंबाजोगाई येथील शासकीय दवाखान्यात उपचारासाठी हलवण्यात आले. परंतु उपचारादरम्यान दोन्हीही मुलींचा दुर्दैवी अंत झाला आहे. तर जयश्री यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. एकाच कुटुंबातील तिघांना अशाप्रकारे सर्पदंश झाल्यानं गावात खळबळ उडाली आहे.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Beed

पुढील बातम्या