Home /News /maharashtra /

शिवसेना नेत्याच्या बंगल्यात बिबट्याचा वावर; मध्यरात्री घुसखोरी करत एका कुत्र्याला केलं भक्ष्य

शिवसेना नेत्याच्या बंगल्यात बिबट्याचा वावर; मध्यरात्री घुसखोरी करत एका कुत्र्याला केलं भक्ष्य

मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास बिबट्यानं बंगल्याच्या परिसरात शिरकाव करत कुत्र्यावर हल्ला केला आहे. (File Photo)

मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास बिबट्यानं बंगल्याच्या परिसरात शिरकाव करत कुत्र्यावर हल्ला केला आहे. (File Photo)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांवतवाडी येथील एका शिवसेना नेत्याच्या अंगणात बिबट्याचा वावर (leopard enters in Shiv Sena leader's bungalow )असल्याची घटना उघडकीस आली आहे.

    सिंधुदुर्ग, 08 सप्टेंबर: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांवतवाडी येथील एका शिवसेना नेत्याच्या अंगणात बिबट्याचा वावर (leopard enters in Shiv Sena leader's bungalow) असल्याची घटना उघडकीस आली आहे. काल रात्री बिबट्यानं संबंधित नेत्याच्या घराच्या परिसरात शिरकाव करत एका कुत्र्याला भक्ष्य (leopard attacked on dog) केलं आहे. सकाळी एक कुत्रा गायब असल्याचं निदर्शनास आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, बिबट्यानं कुत्र्याची शिकार केल्याचं दिसून आलं आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांत दहशत पसरली आहे. बाबल ठाकूर असं संबंधित शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे ते सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष देखील आहे. मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास एका हिंस्त्र बिबट्यानं त्यांच्या बंगल्याच्या परिसरात शिरकाव करत, दोन पाळीव कुत्र्यांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात एका कुत्र्यानं आपली सुटका करून घेतली. पण दुसरा एक पाळीव कुत्रा बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. हेही वाचा-थरकाप! झोपलेल्या तरुणाच्या पांघरुणात शिरला कोब्रा, जाग आल्यावर केला हल्ला विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी याच परिसरात बिबट्यानं एका गायीच्या वासरावर हल्ला केला होता. यानंतर आता नाणोस येथील शिवसेना नेत्याच्या बंगल्यात बिबट्यानं शिरकाव केला आहे. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास बिबट्या बंगल्याच्या परिसरात शिरकाव करत असल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भर वस्तीत बिबट्यानं शिरकाव केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. हेही वाचा-शिकार करायला आला अन् विहिरीत पडला; मांजरीने बिबट्याला दिली कडवी झुंज, पहा VIDEO संबंधित व्हिडीओत बिबट्या दबक्या पावलानं अत्यंत धिम्या पद्धतीनं कुत्र्यांच्या दिशेनं येताना दिसत आहे. यानंतर अचानक बिबट्यानं बंगल्याच्या समोर झोपलेल्या दोन कुत्र्यांवर हल्ला केला. बिबट्यासोबत झालेल्या झटापटीत एका कुत्र्यानं स्वत:ची सुटका करुन घेतली आहे. पण दुसऱ्या एका कुत्र्याला बिबट्याच्या जबड्यातून सुटता आलं नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Leopard

    पुढील बातम्या