मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धुळे-औरंगाबाद महामार्गावर बाईक अन् ट्रॅक्टरने घेतला पेट, सर्व जळून खाक, तिघे गंभीर

धुळे-औरंगाबाद महामार्गावर बाईक अन् ट्रॅक्टरने घेतला पेट, सर्व जळून खाक, तिघे गंभीर

हा अपघात इतका भीषण होता की, काही क्षणात सर्व जळून खाक झालं.

हा अपघात इतका भीषण होता की, काही क्षणात सर्व जळून खाक झालं.

हा अपघात इतका भीषण होता की, काही क्षणात सर्व जळून खाक झालं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

धुळे, 25 नोव्हेंबर : धुळे-औरंगाबाद महामार्गावरील तरवाडेबारी जवळ विचित्र अपघातात झाला असून अपघातात एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. धुळे औरंगाबाद महामार्गावरील तरवाडे बारीजवळ भरदाव मोटरसायकल व ट्रॅक्टर यांच्यात समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दिनेश देसले यांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झालेत.

भरदाव वेगाने येणारी मोटरसायकल ट्रॅक्टरवर धडकल्याने मोटर सायकलची पेट्रोल टाकी फुटली. त्यामुळे मोटरसायकल सह ट्रॅक्टरने लागलीच पेट घेतला. या अपघातात मोटरसायकल सह ट्रॅक्टर जळून खाक झाले आहेत. महामार्गावर झालेल्या या विचित्र अपघातामुळे घटनास्थळी खळबळ उडाली होती. या अपघाताचे काही फोटो समोर आले आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी धाव घेतली. मात्र तोपर्यंत सर्व जळून खाक झाले होते.

बातमी अपडेट होत आहे.

First published:

Tags: Aurangabad News, Road accident