बीड, 9 फेब्रुवारी : महावितरणच्या गलथान कारभारतून एका सहा वर्षीय चिमुकलीला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्देवी घटना परळी शहरात आज दुपारी 3 च्या सुमारास घडली आहे. गौरी वैजनाथ घोटकर,वय 6 वर्षे असं या मृत मुलीचं नाव आहे.
या घटनेने नागरिक संतप्त झाले असून वारंवार सांगूनही विद्युत प्रवाह उतरणाऱ्या पोलची दुरुस्ती केली नसल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे.
महावितरण कार्यालयाच्या अगदी पाठीमागील बाजूस असलेल्या हबीब पुरा भागातील रस्त्यावर असलेल्या विजेच्या सार्वजनिक खांबावर गेल्या अनेक दिवसापासून विद्युत प्रवाह उतरत असल्याचं नागरिकांनी महावितरण कर्मचारी व कार्यालयाला वारंवार कळवलं होतं. मात्र याबाबत महावितरणकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही, असा नागरिकांचा दाव आहे.
हेही वाचा - भीषण अपघातात अख्खं कुटुंबच संपलं; पती, पत्नी आणि लहान मुलाचा जागीच मृत्यू
खेळता खेळता सहा वर्षीय गौरी घोटकर ही या खांबाच्या संपर्कात आली आणि विजेचा धक्का बसल्याने तिला आपला जीव गमवावा लागला. या दुर्दैवी घटनेनंतर या भागातील नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या असून महावितरणच्या गलथान कारभाराने या मुलीला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप करत नागरिकांनी महावितरणच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Beed, Electricity, Girl death, Heartbreaking, Preventive measures, Safety laws