बीड, 29 एप्रिल : बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. इमारतीच्या छतावरील 81 सौर बॅटर्यांची चोरी झाली आहे. यापूर्वीही याच कार्यलयात 4 बॅटर्यांची चोरी झाली होती. आठ महिन्यात दुसऱ्यांदा चोरी झाल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी बीड शहरातील शिवाजीनगर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौर संचातील 81 सौर बॅटर्या चोरीस गेल्याचे कर्मचार्यांच्या लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी पाहणी करुन नायब तहसीलदारांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल केला. याच कार्यालयात घडलेल्या पहिल्या गुन्ह्याचाही तपास अपूर्ण आहे. जिल्हाधिकारी कार्यालय असुरक्षित झालं आहे की काय, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
हेही वाचा - पालघर साधू हत्याकांड प्रकरणी राज्य सरकारची आणखी एक कारवाई
विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात 24 तास सुरक्षा असते. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे असूनही चोरी होत असल्याने सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. थेट जिल्हा अधिकारी कार्यालयात चोरी होते कशी? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.