गनिमी कावा करत 'ते' तुंबाडला पोहोचले, लेकरांना पाहून वर्दीतला माणूसही हादरला!

मुंबईत कोरोनाचा धोका वाढल्यानंतर मुंबई स्थित कोकणातील लोकं वाटेल तो धोका पत्कारून कोकणाकडे येत आहेत.

मुंबईत कोरोनाचा धोका वाढल्यानंतर मुंबई स्थित कोकणातील लोकं वाटेल तो धोका पत्कारून कोकणाकडे येत आहेत.

  • Share this:
    चंद्रकांत बनकर, प्रतिनिधी खेड, 18 एप्रिल :  मुंबईत कोरोनाचा धोका वाढल्यानंतर मुंबई स्थित कोकणातील लोकं वाटेल तो धोका पत्कारून कोकणाकडे येत आहेत. काल गुरुवारी मध्यरात्री अशाच प्रकारे मुंबई येथील दिवा परिसरातून रत्नागिरी जिल्ह्यात जंगलमय भागातून येणाऱ्या 15 जणांना खेड पोलिसांनी पकडले आहे. त्यामध्ये एका सात वर्षाच्या मुलीचा देखील समावेश आहे. तीन दिवस चालल्याने त्या चिमुकल्या मुलीचे पायदेखील सुजलेले पाहायला मिळाले. ही लोकं रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील तुंबाड आणि सवणस गावातील रहिवासी असून व्यवसायानिमित्त अनेक वर्षांपासून दिवा येथे राहतात. हेही वाचा - धक्कादायक! डॉक्टरांनी केलं मृत घोषित, दफन करण्याआधीच उठून बसली महिला कोरोनामुळे मुंबईतील धोका वाढला आहे. मुंबईत कडक लॉकडाउन केला गेला असल्याने भुकेने व्याकुळ झालेले ही लोकं कोकणात आपल्या गावी येण्यासाठी चक्क तीन ते चार दिवस रात्रंदिवस पायी प्रवास करत येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या कशेडी घाटाला पर्यायीमार्ग असणाऱ्या दुर्गम विन्हेरे मार्गे ही लोकं रात्रीच्या काळोखात येताना गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्यांना पकडले. जिल्हा प्रशासनाने रात्री उशिरा त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पोटभर जेवणाची व्यवस्था करून खेडमध्ये त्यांना क्वारंटाइन करून ठेवण्यात आले आहे. शासनाने जरी दोन वेळचे जेवण मिळेल, कोणीही उपाशी राहणार नाही, असं बोलून घरी राहण्याचं आवाहन केले असले तरी मुंबईत मात्र, वस्तुस्थिती वेगळी असल्याचे या लोकांच्या बोलण्यावरून दिसत आहे. लॉकडाउन झाल्यानंर फक्त एकदाच सामाजिक संस्थांकडून खिचडी भात देण्यात आला. हेही वाचा -पुस्तकांच्या फोटोत आहे कथा, पाहा कोरोनाशी लढण्याचं सिक्रेट तुम्हाला सापडतं का? मात्र, नंतर एकवेळ पोटभर जेवण मिळणे, देखील मुश्किल झाले म्हणून ही लोकं आपल्या गावी येण्यासाठी अत्यंत खडतर आणि धोकादायक मार्ग अवलंबून पायी प्रवास करत कोकणात येत असल्याचे दिसून आले आहे. संपादन - सचिन साळवे
    First published: