बब्बू शेख/चांदवड, 7 एप्रिल : आसरखेडाजवळ एसटी बसचा भीषण अपघात झाला असून याचे काही फोटो समोर आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, बसचा चक्काचूर झाला. या भीषण अपघातात महिला कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला आहे. याशिवाय 20 ते 22 प्रवासी गंभीर जखमी असल्याचंही समोर आलं आहे. सध्या जखमींना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. समोरून येणाऱ्या वाहनाने जबर धडक दिल्यामुळे बसचा अक्षरश: चक्काचूर झाला. एसटी बस नांदूरगड येथून मनमाडकडे जाताना हा भीषण अपघात झाला.
आसरखेडाजवळ एसटी बसचा भीषण अपघात, 20 ते 22 प्रवासी गंभीर जखमी, एसटी बस नांदूरगड येथून मनमाडकडे जाताना हा भीषण अपघात झाला. #STbusAccident #BusAccident #crimeNews #News18Lokmat pic.twitter.com/CzUmg6y7OK
— News18Lokmat (@News18lokmat) April 7, 2023
आणखी एका अपघाताने महाराष्ट्र हादरला! रस्त्यावर वाहनाची दुरुस्ती करीत असतानाचा भरधाव कारने दिलेल्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास वर्धा-नागपूर मार्गावरील बोथली शिवारात घडली. मृतांत कान्होलीबारा येथील गणेश मनोहर लिडबे व महादेव मनोहर लिडबे या दोन सख्ख्या भावंडासह गावातीलच उज्वल सुनिल गव्हाळे यांचा समावेश असल्याने कान्होलिबारा गावात शोककळा पसरली.
मिळालेल्या माहितीनुसार, कान्होलीबारा येथील तिघेही मालवाहू बोलेरो वाहनातून हरभऱ्याची पोती घेऊन नागपुरच्या दिशेने जात होती. दरम्यान त्यांचे मालवाहू वाहन वर्धा-नागपूर रस्त्यावरील बोथली शिवारात नादुरुस्त झाले. यावेळी त्यांनी ऍक्टिवाच्या उजेडात रस्त्यावरच वाहन दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. दरम्यान ते रस्त्याच्या ज्या लेनवर वाहन दुरुस्ती करीत होते, त्याच लेनवर एम एच ४९ बीआर ५९५९ क्रमांकाच्या भरधाव कारने आधी ऍक्टिवाला व नंतर त्यांच्या वाहनाला जोरात धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की यात ऍक्टिवा चेंडूसारखी हवेत उडाली. या अपघातात तिघांनाही गंभीर स्वरूपाचा मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी बुट्टीबोरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

)







