जळगाव, 18 जानेवारी : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे जळगावचे (Jalgaon) राजकारण ढवळून निघाले होते. पण, ग्रामपंचायत निवडणुकीत (Maharashtra Gram Panchayat Election Results 2021) भाजपने (BJP) विजय मिळवून गड शाबूत असल्याचे दाखवून दिले आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील सर्वात महत्त्वाची असलेल्या कोथळी ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आल्याची भाजप खासदार रक्षा खडसे यांनी दावा केला आहे. 11 जागांपैकी 2 जागा बिनविरोध झाल्या असून 9 पैकी 6 जागांवर भाजपचे पुरस्कृत पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत.
मागील वेळी कोथळी ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे सरपंच होते. मात्र, आता भाजपाचा सरपंच होणार आहे.
'या निवडणुकीत राजकीय झालेल्या बदलामुळे मोठी जबाबदारी माझावर होती. पहिल्यांदा मी बारकाईने या निवडणुकीत लक्ष घातले असून त्यात मला यश मिळाले' असल्याचे भाजप खासदार रक्षा खडसे यांनी म्हटले आहे.
तर, एकनाथ खडसे यांच्यासाठी प्रतिष्ठेची असलेल्या कोथळी ग्रामपंचायतीत 6 उमेदवार हे एकनाथ खडसे यांना मानणारे असून इतर ही उमेदवार हे नाथाभाऊंना मानणारे, असल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले होते.
विशेष म्हणजे, एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे भाजपला मोठा हादरा बसला होता. जळगावात भाजपच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. अजूनही काही नेते वेटिंगवर आहे. राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली ही पहिली निवडणूक होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gram panchayat