जळगाव, 01 जून: भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) जळगाव दौऱ्यावर आहे. मुक्ताईनगरमधून जात असताना त्यांचा ताफा शिवसैनिकांनी अडवल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी, शेतकऱ्यांच्या केळी पिक विम्याबाबत फडणवीस यांना जाब विचारण्यात आला.
एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर प्रथमच देवेंद्र फडणवीस हे मुक्ताईनगर दाखल झाले आहे. खासदार रक्षा खडसे यांच्या घरी जाऊन त्यांनी भेट घेतली. त्यानंतर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी निघाले असता परिवर्तन चौकात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फडणवीस यांचा ताफा अडवला.
#जळगाव- देवेंद्र फडणवीस यांचा मुक्ताईनगर मधील परिवर्तन चौकात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अडकवला ताफा pic.twitter.com/CRZcbNrtj7
— News18Lokmat (@News18lokmat) June 1, 2021
चंद्रकांत पाटील यांचा आठ महिन्याचा कार्यकाळ होता. त्यांनी हॉस्पिटलची पाहणी केली. स्वत: भावी मुख्यमंत्री म्हणून घेता पण त्यांनीही काहीच काम केले. मुक्ताईनगरच्या जिल्हा हॉस्पिटलचेही काहीच काम केले नाही, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. तसंच, एकनाथ खडसे अनेक वर्ष भाजपचे आमदार असताना सुद्धा कुठली विकास कामे केले नसल्याचा आरोप ही केला.
दरम्यान, मुक्ताईनगरमध्ये त्यांनी भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे.
विशेष म्हणजे, मुक्ताईनगरमध्ये भाजपला मेगा गळती लागली आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजपच्या 10 कार्यकर्तांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. याआधीही अनेक कार्यकर्ते हे राष्ट्रवादीत दाखल झाले आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात चिंतेतं वातावरण आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यामुळे एका प्रकारे डॅमेज कंट्रोल केले जाणार अशी चर्चा रंगली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.