कणकवली, 27 डिसेंबर : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीमध्ये (Sindhudurg District Bank Election 2021) शिवसैनिकावर हल्ला केल्या प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane)अडचणीत सापडले आहे. कणकवली पोलीस ठाण्यात नितेश राणे यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याचे कामकाज पाहण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता नेमण्यात आला आहे. तर या प्रकरणी आता उद्या सुनावणी होणार आहे.
शिवसैनिक संतोष परब हल्ल्या प्रकरणी कणकवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुख्य संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी नितेश राणेंची तीनवेळा चौकशी करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे, या प्रकरणी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून अॅड. प्रदीप दत्तात्रय घरात मुंबई व सह अभियोक्ता म्हणून अॅड. भूषण रामचंद्र साळवी जिल्हा सरकारी अभियोक्ता रायगड यांची विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे त्यांनी सदर पत्र अपर मुख्य सचिव गृह विभाग महाराष्ट्र सरकार यांना पत्राद्वारे कळविण्यात कळवलं आहे. त्यामुळे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ला भाजप आमदार नितेश राणे यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.
तर या प्रकरणी आमदार नितेश राणे यांनी अटक पूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. यावर उद्या मंगळवारी सुनावणी होणार आहे.
काय घडलं नेमकं?
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुक प्रचारात १८ डिसेंबर रोजी कणकवलीत शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीमधून मोठ्या शिताफीने अटक केली. मुख्य आरोपी सचिन सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. संतोष परब यांच्यावर हल्ला केल्यानंतर सचिन सातपुते त्याचा मोबाईल फोन बंद करून फरार झाला होता. त्यामुळे त्याचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. मात्र तरीही सिधुदूर्ग ग्रामिण पोलिसांनी तपास वेगवान करून मोठ्या शिताफीने सचिन सातपुतेला अटक केली. मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिधुदुर्ग ग्रामीण पोलीस आज कणकवली किंवा कुडाळ पोलीस स्टेशनला हजर करणार असल्याचीही माहिती मिळतेय. याच प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांची दोन दिवस कणकवली पोलिसांनी चौकशीही केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.