शिवसेनेला मोठा दिलासा, या महिला बंडखोर उमेदवाराने घेतली माघार

शिवसेनेला मोठा दिलासा, या महिला बंडखोर उमेदवाराने घेतली माघार

शुक्रवारी औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या मतदान प्रक्रियेमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. दोन्ही गटाला समसमान मतदान पडल्याने प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती.

  • Share this:

औरंगाबाद, 04 जानेवारी : राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारला शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यामुळे मोठा धक्का बसला असताना शिवसेनेसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार देवयानी डोनगावकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे सेनेतील बंड टळले असं म्हणायला हरकत नाही.

शुक्रवारी औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या मतदान प्रक्रियेमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. दोन्ही गटाला समसमान मतदान पडल्याने प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. यावेळी शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार देवयानी डोनगावकर यांची गाडी शिवसैनिकांनी अडवली. त्यानंतर काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेच्याच अध्यक्षा देवयानी डोनगावकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. पण अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यामुळे देवयानी यांनी उमेदवारी मागी घेतली असल्याची माहिती समोर येत आहे.

अब्दुल सत्तार यांचा मंत्रिपदाचा राजीनामा, उद्धव ठाकरे सरकारला पहिला धक्का

राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. कारण शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कॅबिनेट मंत्रिपदासाठी आग्रही असलेल्या अब्दुल सत्तार यांना शिवसेनेकडून राज्यमंत्रिपद देण्यात आलं होतं. त्यामुळे ते नाराज होते. या पार्श्वभूमीवरच त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती आहे.

इतर बातम्या - तुम्हाला मिळतील 35 लाख, बिल गेट्स यांनी दिलीय ऑफर!

खातेवाटपाचं गुऱ्हाळ

खातेवाटपावरून महाआघाडी सरकारमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मात्र शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता होताना दिसत नव्हती. मात्र आता अखेर काँग्रेसला चार वाढीव खाती दिल्यानंतर आज काँग्रेसची यादी दिल्लीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे येणं अपेक्षित आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची खातेवाटपाबाबत शुक्रवारी रात्री बैठक झाली. राष्ट्रवादीच्या या बैठकीत पक्षाच्या वाट्याला आलेल्या खात्यांच्या वाटणीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ही एकत्रित यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्यानंतर त्याला राज्यपाल यांची मान्यता घेतली जाईल. त्यानंतर आज दुपारपर्यंत खातेवाटपाची घोषणा होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 4, 2020 02:59 PM IST

ताज्या बातम्या