युतीच्या जागांचा फॉर्म्युला काय? या नेत्याच्या घरी झाली पहिली बैठक

युतीच्या जागांचा फॉर्म्युला काय? या नेत्याच्या घरी झाली पहिली बैठक

या निवडणुकीत महायुती करून लढल्यास किती जागा मिळतील, याचा सर्व्हेदेखील भाजपने केला आहे. विरोधकांतील नाराज नेत्यांना आपल्याकडे खेचत विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेनं आपली दावेदारी आणखीनच मजबूत केली आहे.

  • Share this:

मुंबई, 4 सप्टेंबर : शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या जागावाटपाच्या बैठकीला आजपासून सुरुवात झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मुंबईच्या निवासस्थानी ही बैठकीची पहिली फेरी पार पडली.

भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई या नेत्यांमध्ये ही बैठक झाली.

या बैठकीत महायुतीचा सर्व्हे आणि उरलेल्या जागांच्या वाटाघाटींवर प्राथमिक चर्चा झाली. घटक पक्षांच्या वाट्याला कुठल्या आणि किती जागा येतील यावरही या नेत्यांनी चर्चा केली.

लोकसभा निवडणुकीत विराट विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीतही बाजी मारण्यासाठी भाजप-शिवसेना युतीचे प्रयत्न सुरू आहेत. राजकीय वर्तुळातील काही घडामोडींमुळे युती होणार की नाही, याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.

RED Alert! राज्याच्या या 5 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

असं असलं तरीही विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणूनच सामोरे जाण्याचा निर्णय भाजपने घेतल्याचं दिसत आहे. या निवडणुकीत महायुती करून लढल्यास किती जागा मिळतील, याचा सर्व्हेदेखील भाजपने केला आहे.

विरोधकांतील नाराज नेत्यांना आपल्याकडे खेचत विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेनं आपली दावेदारी आणखीनच मजबूत केली आहे. पण तरीही सध्यातरी हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याचा धोका पत्करण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसत आहे. म्हणून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी महायुतीचा सूर आळवायला सुरुवात केली आहे.

काय आहे भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत?

विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना आणि इतर मित्रपक्ष अशी महायुती झाल्यास तसंच काँग्रेस-राष्ट्रवादी आपल्या मित्रपक्षांसह लढल्यास महायुतीला 229 जागा मिळतील, असं भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेतून समोर आल्याचं भाजपच्या एका मंत्र्यांचं म्हणणं आहे. भाजपच्या मंत्र्याच्या या दाव्यामध्ये कितपत तथ्य आहे, हे तर निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. मात्र या आकड्यांच्या साहाय्याने विरोधकांचं मनोबल खच्ची करण्याचा पुरेपूर प्रयत्न युतीच्या नेत्यांकडून होईल, असं चित्र आहे.

=============================================================================================================

SPECIAL REPORT : या कारणामुळे आली आहे मंदी, पाहा VIDEO

First published: September 4, 2019, 8:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading