• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • शिवसेना भवनानंतर पुन्हा एकदा शिवसेना- भाजपमध्ये झुंपली, कार्यकर्त्यांमध्ये तुफान धुमश्चक्री

शिवसेना भवनानंतर पुन्हा एकदा शिवसेना- भाजपमध्ये झुंपली, कार्यकर्त्यांमध्ये तुफान धुमश्चक्री

शिवसेना भवननंतर आता सिंधुदुर्गमध्ये शिवसेना (Shivsena) आणि भाजपच्या (Bjp) कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे.

 • Share this:
  सिंधुदुर्ग, 19 जून: शिवसेना भवननंतर आता सिंधुदुर्गमध्ये शिवसेना (Shivsena) आणि भाजपच्या (Bjp) कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या शिवसेना भवनाबाहेर झालेला वाद थंड होत नाही. तोवर पुन्हा एकदा सिंधुदुर्गमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. सिंधुदुर्गात शिवसेनेचे आमदार वैभव नाईक हे भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान पोलिसांच्या मध्यस्थीमुळे पुढचा अनर्थ टळला आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनी आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी एका उपक्रमाचं आयोजन केले. मात्र या आयोजनात त्यांनी भाजप (BJP)ला डिवचण्याचाही प्रयत्न केला. वर्धापनानिमित्त वैभव नाईक यांनी स्वस्त दरात पेट्रोल वाटपाची घोषणा केली आहे. उपक्रमानुसार एका पेट्रोल पंपावर स्वस्तात पेट्रोल वाटप सुरु केलं गेलं. मात्र ते पेट्रोल पंप नारायण राणे यांच्या मालकीचं होतं. पेट्रोल पंपावर नागरिकांना पेट्रोल खरेदी करण्यासाठी वैभव नाईक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते पैसे वाटत होते. तिथे भाजपचे कार्येकर्ते आले आणि त्यांनी यावर आक्षेप घेतला. त्यानंतर या आक्षेपाचं रुपांतर वादात झालं. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु करत एकमेकांच्या अंगावर धावून गेले. वैभव नाईक यांनीही या हाणामारीत भाग घेतला. ते सुद्धा भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले. मात्र पोलिसांनी लगेचच हस्तक्षेप केल्यानं पुढील अनर्थ ठळला. वैभव नाईक यांच्या उपक्रमात सर्वसामान्य नागरिकांना 100 रुपयांत 2 लिटर पेट्रोल (प्रति वाहन) देण्यात येणार होतं. भाजप सदस्यत्वाचे ओळखपत्र दाखवणाऱ्यांना प्रत्येकी 1 लीटर पेट्रोलचे मोफत वाटप करण्यात येणार होतं. आमदाराच्या उपक्रमाची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली.
  Published by:Pooja Vichare
  First published: