जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिवसेनेतील फुटीमुळे सर्वसामान्य दुखावला; आदित्य ठाकरेंच्या सभेतील तो Video हृदय पिळवटून टाकेल  

शिवसेनेतील फुटीमुळे सर्वसामान्य दुखावला; आदित्य ठाकरेंच्या सभेतील तो Video हृदय पिळवटून टाकेल  

शिवसेनेतील फुटीमुळे सर्वसामान्य दुखावला; आदित्य ठाकरेंच्या सभेतील तो Video हृदय पिळवटून टाकेल  

हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 23 जुलै : शिवसेनेतील तब्बल ५० आमदार फुटणे ही महाराष्ट्राच्या राजकारणाला झटका देणारं वृत्त होतं. अनेकांना या वृत्तामुळे हादरा बसला. मात्र सर्वाधिक धक्का हा सर्वसामान्य शिवसैनिकांना बसला. अनेक वर्षांपासून आपल्या नेतृत्वासाठी अहोरात्र झटणाऱ्या या शिवसैनिकांना आपल्याच कुटुंबाचे दोन भाग होताना पाहावे लागले. अनेकांना शेवटपर्यंत वाटत राहिलं की, गेलेले आमदार परत येतील. मात्र तसं काहीच झालं नाही. उलटपक्षी एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या घटनेनंतर आता आदित्य ठाकरे महाराष्ट्रभरात संवाद यात्रा करीत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील शिवसैनिकांची भेट घेतली आणि आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. गंगापूर येथील एका सभेदरम्यानच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये सभेतील एक शिवसैनिक अक्षरश: रडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केल्याने आपल्याला दु:ख झाल्याचं त्यांनी स्वत: मान्य केलं आहे. पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयामुळे आपल्याला शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यास मान्य करावं लागल्याची उद्विग्नता त्यांनी आज भाजपच्या मेळाव्यात व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यातील हा व्हिडीओ आधी भाजपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर होता. पण चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरुन उलटसुलट चर्चा सुरु झाल्यानंतर भाजपने त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन हटवला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात