अभिमानास्पद! शिवजयंतीच्या निमित्ताने बल्गेरियाचे राजदूत करणार मराठीत भाषण

अभिमानास्पद! शिवजयंतीच्या निमित्ताने बल्गेरियाचे राजदूत करणार मराठीत भाषण

राजधानी दिल्लीमध्ये येत्या 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी : अवघ्या मराठी मुलुखाचा मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या अनेक भागात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. राजधानी दिल्लीमध्ये येत्या 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे.

दिल्ल्तीत होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये बारा देशांचे राजदूत सहभागी होणार असून यामध्ये बल्गेरिया या देशाच्या राजदूत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मराठीमध्ये गौरवोद्गार काढणार आहेत.

राजधानी दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदनामध्ये यावर्षी शिवजयंती सादरी करण्यात येणार आहे. यासाठी नाशिक येथून ढोल पथकदेखील दिल्लीत पोहोचले आहे. सोबतच महाराष्ट्रातील अनेक तरुण या शिवजयंती सोहळ्यात सहभागी होण्याकरिता दिल्लीत पोहोचले आहेत.

महाराष्ट्र सदनाच्या अंगणामध्ये लेझीम पथक आणि मर्दानी खेळांचे सादरीकरण होणार आहे. यासाठी हे सर्व कलाकारदेखील दिल्लीत दाखल झाले आहेत. कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या राजदूतांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पुस्तके देण्यात येणार आहेत. हे सर्व राजदूत आपल्या देशाांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवाचा उल्लेख करताना या साहित्यसंपदेचं साह्य व्हावे, असं यामागील उद्दिष्ट आहे.

शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सदनालाा सजविण्यात प्रारंभ करण्यात आला आहे. महाराष्ट्र सदनाच्या परिसरात रांगोळीही काढण्यात येणार आहे.

First published: February 18, 2020, 8:01 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading