मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'कठोर निर्बंध आवश्यक', कोरोनाबाबत शरद पवारांनी राजकीय पक्षाच्या नेत्यांसह सर्वांनाच केलं खास आवाहन

'कठोर निर्बंध आवश्यक', कोरोनाबाबत शरद पवारांनी राजकीय पक्षाच्या नेत्यांसह सर्वांनाच केलं खास आवाहन

शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हद्वारे (NCP Sharad Pawar Facebook Live) विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांना आणि राज्यातील जनतेला विशेष आवाहन केलं आहे.

शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हद्वारे (NCP Sharad Pawar Facebook Live) विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांना आणि राज्यातील जनतेला विशेष आवाहन केलं आहे.

शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हद्वारे (NCP Sharad Pawar Facebook Live) विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांना आणि राज्यातील जनतेला विशेष आवाहन केलं आहे.

मुंबई, 8 मार्च : राज्यात कोरोना व्हायसरचा (Coronavirus) प्रकोप सुरू असून दिवसागणिक रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हद्वारे (NCP Sharad Pawar Facebook Live) विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांना आणि राज्यातील जनतेला विशेष आवाहन केलं आहे.

पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची स्थिती आता जास्त गंभीर आहे, असं सांगत शरद पवार यांनी विविध शहरांतील सक्रिय रुग्णांचा आकडा सर्वांसमोर ठेवला. 'या परिस्थितीतून आपल्याला यशस्वीपणे बाहेर पडायचं असेल तर सामूहिक प्रयत्न करावे लागतील. यासाठी माझी समाजातील सर्वच घटकांना, मग तो व्यापारी असेल, नोकरदार असेल किंवा विविध राजकीय पक्षांचे नेते या सर्वांना विनंती आहे की परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारचे जे प्रयत्न आहेत, त्यांना आपण सगळ्यांनी सहकार्य करावं,' असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

शरद पवार यांच्या फेसबुक लाईव्हमधील ठळक मुद्दे :

- राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या

- कोरोनाची वाढ अतिशय चिंताजनक

- रुग्णवाढीमुळे आरोग्य यंत्रणांवर ताण

- कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणणं आवश्यक

- कोरोनाची साखळी आपल्याला तोडावी लागेल

- आता कठोर निर्बंध आवश्यक

- सर्व घटकांना कोरोना संकटामुळे आर्थिक झळ

- आपल्याला वास्तव नाकारून चालणार नाही

- परिस्थितीला धैर्यानं सामोरं जावं लागेल

- कोरोनावर मात करण्यासाठी सहकार्य करा, राज्यातील जनतेला शरद पवारांचं आवाहन

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Sharad Pawar (Politician)