जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिवजयंतीनिमित्त मनसेने पुन्हा दाखवली ब्ल्यू प्रिंट, राज ठाकरेंच्या आवाजात विकासाचा Video

शिवजयंतीनिमित्त मनसेने पुन्हा दाखवली ब्ल्यू प्रिंट, राज ठाकरेंच्या आवाजात विकासाचा Video

शिवजयंतीनिमित्त मनसेने पुन्हा दाखवली ब्ल्यू प्रिंट, राज ठाकरेंच्या आवाजात विकासाचा Video

शिवजयंतीनिमित्त मनसेने पुन्हा एकदा त्यांची ब्ल्यू प्रिंट दाखवली आहे. मनसेने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून विकासाची ही ब्ल्यू प्रिंट शेअर केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 फेब्रुवारी : महाराष्ट्रासह देशभरात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे. शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्माचा सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. याशिवाय आग्र्याच्या लाल महालात जिथून छत्रपती शिवाजी निसटले तिथेही यंदा पहिल्यांदाच शिवजयंतीचा कार्यक्रम होणार आहे. शिवजयंतीनिमित्त मनसेने पुन्हा एकदा त्यांची ब्ल्यू प्रिंट दाखवली आहे. मनसेने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून विकासाची ही ब्ल्यू प्रिंट शेअर केली आहे. ‘ज्या एका महान माणसाने आम्हाला आमची ओळख करून दिली आणि आम्ही का जगायचं याचा मंत्र दिला त्या आपल्या सर्वांच्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अर्पण केलेला महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा’, असं सांगत मनसेने सत्तेत आल्यास महाराष्ट्राचा विकास कसा करणार याचा आराखडा दिला आहे.

जाहिरात

या ब्ल्यू प्रिंटमध्येच मनसेने राज ठाकरे यांच्या आवाजातलं एक प्रेझेंटेशनही शेअर केले आहे, त्यातही राज ठाकरेंनी महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास कसा करणार? यावर भाष्य केलं आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकांआधी राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट शेअर केली होती. मनसेच्या हातात सत्ता दिली तर ब्ल्यू प्रिंटच्या धर्तीवर महाराष्ट्राचा विकास करू, असं राज ठाकरे म्हणाले होते. मनसेची ही ब्ल्यू प्रिंट तयार करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांची मदत घेण्यात आल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात