अहमदनगर, 22 मे: राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना आज निळवंडे धरणाच्या (Nilvande Dam) कामांची पाहणी करताना सेनेच्या खासदाराला डावलल्यामुळे सेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे (Shiv Sena MP Sadashiv Lokhande) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाराज झालेल्या खासदारांनी म्हटलं, मंत्री आणि अधिकाऱ्यांना वेगळे नियम नाहीत. त्यांच्यावर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी खासदारांनी पोलिसांकडे केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी गेल्या पाच दशकापासून ज्या निळवंडे धरणाच्या पाण्याची वाट बघत आहेत त्या धरणाच्या कालव्यांचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी एकत्रित अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या कालव्यांची आज पाहणी केली. आढळा नदीवरील बांधण्यात आलेल्या सेतू पुलाची पाहनी करत निधी कमी पडणार अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिलीत. मात्र या पाहणी दरम्यान मतदारसंघातील शिवसेनेच्या खासदारालाच निमंत्रण नसल्यानं खासदार सदाशिव लोखंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
— News18Lokmat (@News18lokmat) May 22, 2021
आज शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, भाजप युतीच्या काळात या धरणाच्या कामाला गती मिळाली होती त्यामुळे आज हे काम होत आहे. मात्र यात राजकारण न आणता सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची गरज असताना आज काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते कार्यक्रम घेत आहेत आणि मला निमंत्रण दिले जात नाही हे दुर्दैवी असल्याचं खासदार सदाशिव लोखंडे यांनी म्हटलं आहे. या संदर्भात खासदार सदाशिव लोखंडे यांनी अधिकाऱ्यांना विचारले असता जमावबंदी आदेशामुळे कोणताही कार्यक्रम करता येणार नसल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, आज तीन मंत्री येतात आणि कार्यक्र करता, त्यांना काय वेगळे कायदे आहेत का असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी अनिल परबांवर संतापले काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे मुंबईतील एका कार्यक्रमाला काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांना न बोलावल्याने त्यांनीही आक्रमक पवित्रा घेतला होता. काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी थेट शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यावर टीका करताना गंभीर आरोप केले होते.