सिंधुदुर्ग, 20 जुलै : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा हाहाकार वाढतच चालला आहे. रोज कोरोनाच्या रुग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर येत. अनेक डॉक्टर, आरोग्यसेवा कर्मचारी, पोलीस ते राजकारण्यांपर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना आमदार वैभव नाईक यांनीदेखील कोरोनाची लागण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यानंतर कोरोनाची चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वैभव नाईक यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
सध्या डॉक्टरांचं पथक नाईक यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेत आहे. गेल्या 5 दिवसांपासून नाईक ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आले होते. त्यांचा शोध सुरू असून त्यांचीही कोविड टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, रविवारी शिवसेना नेते आणि राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचा कोरोना अहवाल येईपर्यंत सगळं सोनई गावच चिंतेत होतं. मात्र सुदैवाने त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आणि नागरिकांचा जीव भांड्यात पडला. शंकरराव गडाख यांची पत्नी सुनिता गडाख यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शंकरराव गडाख यांनी स्वत: हून क्वारंटाइन झाले आहेत. सुनिता गडाख यांच्यावर अहमदनगर येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुण्यातल्या सलोनी सातपुतेच्या VIRAL डान्समागे आहे वेगळं कारण, वाचा INSIDE STORY
राज्यात लॉकडाऊन असूनही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद पाठोपाठ आता ग्रामीण भागातही कोरोनाचं संकट अधिक गडद झाल्याचं पाहायला मिळत आहे. कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर (वय-89) यांचा कोरोना रिपोर्ट यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यावर पुण्यात पुढील उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
सिक्युरिटी गार्डच्या खात्यात मोठी रक्कम असल्याची टीप, थेट केला भयानक मर्डर
राज्यात सगळ्यात आधी राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. उपचारानंतर आता हे नेते कोरोनामुक्त झाले आहेत. त्याच प्रमाणे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील कोरोनावर मात केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus