Home /News /maharashtra /

"मी स्वत: अडचणीत आहे तर मंत्र्यांच्या अडचणीचं काय विचारता?" प्रताप सरनाईकांच्या विधानाने खळबळ

"मी स्वत: अडचणीत आहे तर मंत्र्यांच्या अडचणीचं काय विचारता?" प्रताप सरनाईकांच्या विधानाने खळबळ

ठाण्यात एका कार्यक्रमा दरम्यान शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आपण किती अडचणीत आहोत पत्रकारांसमोर जाहीरपणे बोलून दाखवले…

ठाणे, 26 ऑगस्ट : मीच स्वतः अडचणीत आहे त्यामुळे दुसऱ्यांच्या अडचणीबाबत मला काय विचारता असं वक्तव्य शिवसेनेचे ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक (Shiv Sena MLA Pratap Sarnaik) यांनी केल्याने ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. कारण हे तेच शिवसेनेचे आमदार आहेत ज्यांनी शिवसेनेने भाजपशी (BJP) जुळवून घ्या नाही तर शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर मंत्र्यांवर गुन्हे दाखल होतील, केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागेल असं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं होतं. त्यानंतर आता तर आपण किती अडचणीत आहोत याबाबत जाहीरपणे वक्तव्य करून प्रताप सरनाईक किती अडचणीत आहेत ते पुन्हा एकदा समोर आलंय. ठाण्यामध्ये संस्कृती युवा प्रतिष्ठान दरवर्षी मोठ्या प्रमाणात दहीहंडीचे आयोजन करतात. मात्र यंदा करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता दहीहंडी उत्सवावर अनेक निर्बंध आणले आहेत. यामुळे यंदाही दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करता येणार नाही. हे लक्षात घेऊन संस्कृती युवा प्रतिष्ठानने दहीहंडी उत्सवा करता करत असलेला लाखो रुपयांचा खर्च शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या ओवळा माजिवडा या मतदार संघामध्ये आरोग्य सुविधा देण्याकरता वापरणार असल्याचे जाहीर केले होते. याच पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधांचा लोकार्पण कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमा दरम्यान आमदार प्रताप सरनाईक यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बाबत प्रश्न विचारला असता त्यांनी आपण नारायण राणे त्यांच्यावर भाष्य करण्या इतपत मी मोठा नाहीये अशी प्रतिक्रिया आमदार प्रताप सरनाईक यांनी दिलीये. Narayan Rane EXCLUSIVE: "17 सप्टेंबरनंतर प्रहारमधून टार्गेट करणार"  तर, नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर जे गेली दोन दिवस राज्यात घडले त्यावर मौन सोडत आमदार प्रताप सरनाईक बोलले की, शिवसैनिक हा सदैव आक्रमक आहे आणि काल शिवसैनिकांनी दाखवून दिलेला आहे. जर उद्धव ठाकरे म्हणजेच पक्षप्रमुख यांच्या विरोधात कोणी काही वेडेवाकडे बोलत असेल तर आक्रमक शिवसैनिक त्याला कसे उत्तर देतात. तर, गेली दोन दिवस ज्या घटना घडल्या ते पाहता हल्लीच्या राजकीय नेत्यांनी यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण यासारख्या नेत्यांचा आदर्श घ्यावा तसच बाळासाहेब ठाकरे यांचे इंदिरा गांधी, सोनिया गांधी, शरद पवार एवढेच नाही तर देशातील अनेक मोठ्या राजकीय नेत्यांशी मतभेद होते पण जेव्हा महाराष्ट्राची पत राखण्याचा विषय यायचा तेव्हा बाळासाहेब सर्वांना एकत्र घेऊन काम करायचे. हा आदर्श आजच्या सर्व नेत्यांनी राखला पाहिजे असाही सल्ला ही यावेळेस शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला. पण ज्या वेळेस पत्रकारांनी प्रताप सरनाईक यांना दोन दिवसापूर्वीच्या अनिल परब यांच्या व्हायरल झालेल्या क्लिप बद्दल विचारले असता “मीच स्वतः अडचणीत आहे इतरांच्या अडचणी बद्दल मला काय विचारता” असं वक्तव्य केलं. हे वक्तव्य करताना प्रताप सरनाईक हे हसत होते मात्र त्यांच्या चेहऱ्यावर तणव स्पष्टपणे दिसत होता. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील अनेक आमदार मंत्री यांच्याविरोधात पुन्हा येडी सीबीआय आयकर विभाग यांच्या चौकशीचा ससेमिरा सुरू होईल अशी चर्चा जोर धरू लागली आहे याच मुळे प्रताप सरनाईक यांनी हे वक्तव्य केले का? अशी चर्चा देखील ठाण्यात रंगू लागलीये.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Mla pratap sarnaik, Shiv sena

पुढील बातम्या