मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

OBC आणि मराठा आरक्षणावरून वादंग निर्माण झालं असतानाच शिवसेनेच्या माजी मंत्र्याचं मोठं वक्तव्य

OBC आणि मराठा आरक्षणावरून वादंग निर्माण झालं असतानाच शिवसेनेच्या माजी मंत्र्याचं मोठं वक्तव्य

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे.

अहमदनगर, 7 फेब्रुवारी : 'मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमची हरकत नाही, मात्र ओबीसींचे आरक्षण कमी न करता किंवा ओबीसी आरक्षणात ढवळा ढवळ न करता त्यांना आरक्षण द्यावं,' अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे तेली समाजाच्या वतीने राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्षीरसागर बोलत होते. आरक्षणासाठी मराठा समाज आग्रही असताना राज्यभरात विविध आंदोलने सुरू आहेत. तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे. यावर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ओबीसी आरक्षणात ढवळा ढवळ न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमची हरकत नसल्याचं क्षीरसागर यांनी म्हंटलं आहे. हेही वाचा - उद्धव ठाकरेंना कोणतंही वचन दिलं नव्हतं, अमित शहांचा पुन्हा एकदा मोठा खुलासा अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वात तेली समाजाचा राज्यस्तरीय मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यासाठी काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी तसंच माजी आमदार शिवाजी चोथे यांची देखील उपस्थिती होती. ओबीसीसाठी असलेल्या केंद्राच्या 27% आरक्षणाचे वर्गीकरण होऊन अती मागास वर्गात तेली समाजाला समाविष्ठ करावे. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा, तसंच संख्येच्या प्रमाणात तेली समाजाला राजकीय आरक्षण मिळावे, आशा मागण्या जयदत्त क्षीरसागर यांनी या मेळाव्यातून केल्या आहेत.
First published:

Tags: Maratha reservation, ओबीसी OBC

पुढील बातम्या