मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO: शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर ईडीची कारवाई? अडसूळांनी म्हटलं....

VIDEO: शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर ईडीची कारवाई? अडसूळांनी म्हटलं....

Shiv Sena leader ed inuiry: शिवसेनेचे विदर्भातील दिग्गज नेत्याच्या ईडी चौकशीची जोरदार चर्चा होत आहे.

Shiv Sena leader ed inuiry: शिवसेनेचे विदर्भातील दिग्गज नेत्याच्या ईडी चौकशीची जोरदार चर्चा होत आहे.

Shiv Sena leader ed inuiry: शिवसेनेचे विदर्भातील दिग्गज नेत्याच्या ईडी चौकशीची जोरदार चर्चा होत आहे.

  • Published by:  Sunil Desale

अमरावती, 10 सप्टेंबर : महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारमधील नेत्यांच्या मागे सध्या ईडीचा (ED) ससेमिरा लागलेला आहे. याच दरम्यान शिवसेनेचे (Shiv Sena) नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांच्यावर ईडीची कारवाई होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा इतकी वाढली की अखेर स्वत: आनंदराव अडसूळ यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.

आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी बँकेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातच ईडीने आनंदराव अडसूळ यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयाची झडती घेतली असल्याची चर्चा सुरू आहे. यावर आनंदराव अडसूळ यांनी प्रतिक्रिया देत अमरावतीच्या खासदार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

त्या पत्रावरुन वडेट्टीवार संतापले अन् म्हणाले, "पडळकर हा अज्ञानी बालक, उगवलेले नवीन गवत"

काय म्हटलं आहे आनंदराव अडसूळ यांनी

आनंदराव अडसूळ म्हणाले, आमदार रवी राणा यांच्याद्वारे माझ्या विरुद्ध केलेल्या कथीत तक्रारी प्रकरणात ईडीच्या छापेमारी झालेल्या नाहीत. ईडीद्वारे करणअयात आलेल्या चौकशीला संपूर्ण सहकार्य आम्ही केले असून झालेल्या चौकशीत सत्य काय ते निष्पन्न झालेले आहे. प्रत्येकवेळी खासदार नवनीत राणा यांच्याविरुद्ध माझ्या याचिकेमध्ये सुनावणी असताना ईडीद्वारे नोटीस देऊन चौकशीला त्याच तारखेला बोलावण्यात येते असे उच्च न्यायालयाच्या प्रकरणांमध्येही झाले आहे.

न्यायालयात माझ्या प्रकऱणावर नवनीत राणा यांच्याविरुद्ध बनावट जात प्रमाणपत्र विषयी असलेली याचिका सुनावणीसाठी ठेवण्यात आली असताना त्यादिवशीही जाणीवपूर्वक ईडीचे अधिकारी माझ्या निवासस्थानी पाठवण्यात आले होते. केंद्राकडून आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा दाम्पत्यांच्या प्रेमापोटी वापरण्यात येणाऱे दबावतंत्राला मी घाबरणार नाही. आमदार राणाद्वारे कथितरित्या पसरविल्या जाणाऱ्या बातम्यांना बळी पडू नये आणि माध्यमांनीही जनतेसमोर वस्तुस्थिती ठेवावी असंही त्यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: ED, Shiv sena