• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • शिर्डी साईबाबा संस्थानकडून प्रसारमाध्यमांवर सूड भावना, पत्रकारावर गुन्हा दाखल

शिर्डी साईबाबा संस्थानकडून प्रसारमाध्यमांवर सूड भावना, पत्रकारावर गुन्हा दाखल

संस्थानकडून माध्यम प्रतिनिधीविरोधात फिर्याद देण्यात आल्याने हे कृत्य सूड बुद्धीने केलं गेल्याची चर्चा होत आहे.

  • Share this:
शिर्डी, 31 जानेवारी : शिर्डी साईबाबा (Shirdi Sai Baba) संस्थानकडून प्रसारमाध्यमांविरोधात सूड भावनेचं वर्तण केलं जात असल्याचं दिसत आहे. मंदिर परिसरात भाविकांची प्रतिक्रिया घेतली आणि गर्दी जमा केली म्हणून एका वृत्त वाहिनीच्या रिपोर्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप करत हा गुन्हा दाखल करण्यात आला. 16 नोव्हेंबर 2020 रोजी मंदिरे खुली करण्यात आली. त्यावेळी करण्यात आलेल्या वृत्तांकनाबाबत आता शिर्डी संस्थानकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल अडीच महिन्यानंतर हा गुन्हा दाखल केला गेला. हा गुन्हा दाखल व्हावा, यासाठी साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी राजेंद्र ठाकरे यांनी फिर्याद दिली आणि भादंवी कलम 353, 188, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, एकीकडे गावकरी आणि शिर्डी संस्थान हा संघर्ष सुरू असतानाच संस्थानकडून माध्यम प्रतिनिधीविरोधात फिर्याद देण्यात आल्याने हे कृत्य सूड बुद्धीने केलं गेल्याची चर्चा होत आहे. गावकरी आणि मुख्याधिकारी संघर्ष होण्याची चिन्हे पत्रकारांनंतर आता शिर्डीच्या ग्रामस्थांसाठी साईबाबा संस्थानने नियमावली बनवण्याचा घाट घातला आहे. आचारसंहितेवर हायकोर्टाचे शिक्कामोर्तब झाले तर शिर्डीच्या ग्रामस्थांनाही जाचक सामना करावा लागणार आहे. शिर्डी मंदिराचे मुख्य अधिकारी यांच्या भूमिकेवरून गावकरी आणि अधिकारी यांचा पुन्हा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. हेही वाचा - गोवा बनावटीच्या दारूचा अवैध साठा, छापेमारीनंतर मोठी कारवाई ग्रामस्थांनी काही मागण्या साईबाबा संस्थानकडे केल्या होत्या. मात्र मुख्याधिकारी के एच बगाटे यांनी त्यास केराची टोपली दाखवली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी गावबंद आणि आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर चार दिवसांपूर्वी आमदार राधाकृष्ण विखे यांनी ग्रामस्थांच्या मागण्याविषयी मुख्याधिकारी बगाटे यांच्याशी चर्चा केली आणि समेट घडवून आणलं होतं. आता मात्र साईसंस्थानने गावकऱ्यांसाठी आचारसंहिता तयार केली असून यामुळे दररोज साईदर्शन घेणाऱ्या गावकऱ्यांना जाचक व्यवस्थेतून जावं लागणार आहे. एकीकडे चर्चा करताना अशी कोणतीही नियमावली बनवली जाणार नसल्याचं अधिकारी सांगत होते. मात्र प्रत्यक्षात नियमावली मंजुरीसाठी उच्च न्यायालयात सादर केल्याची बाब समोर आल्यानं ग्रामस्थ आता आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिर्डीतील काही प्रमुख ग्रामस्थांनी आज बैठक घेतली आणि याविरोधात लढा उभारण्याचा निर्धार केला आहे.
Published by:Akshay Shitole
First published: