Home /News /maharashtra /

गोवा बनावटीच्या दारूचा अवैध साठा, छापेमारीनंतर मोठी कारवाई

गोवा बनावटीच्या दारूचा अवैध साठा, छापेमारीनंतर मोठी कारवाई

गोवा राज्य बनावटीच्या आणि विदेशी मद्य साठ्यावर उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकली आहे.

रत्नागिरी, 31 जानेवारी : खेड (Khed) तालुक्यातील लोटे माळ येथे गोवा राज्य बनावटीच्या आणि विदेशी मद्य साठ्यावर उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकली आहे. यावेळी 7 लाख 72 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून निहार वारणकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वाय.एम.पवार, विभागीय उपआयुक्त कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक डॉ.बी.एच.तडवी व उप अधीक्षक व्ही.व्ही.वैद्य यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली 30 जानेवारी रोजी खेड विभागातील माजे खेड लोटे MIDC व राष्ट्रीय महामार्ग क्र.66 रोडबर अवैध मद्याची तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गस्ती मोहिम राबविण्यात आली. त्यानंतर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क खेड विभाग यांना गोपनीय बातमी मिळाली की मौजे लोटेमाळ म्हसोबावाड़ी येथे राहणारा निहार हेमंत वारणकर याच्या राहत्या घरातील एका बंदिस्त खोलीत गोवा राज्य बनावटीचा विदेशी मद्याचा अवैध साठा ठेवलेला आहे. हेही वाचा - वाहन चालकाच्या बेफिकिरीमुळे चिंकाराने गमावला जीव, वनविभाग उचलणार महत्त्वूपर्ण पाऊल ही माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी जाऊन छापा टाकला असता सदरील बंदिस्त खोलीत अवैध गोवा बनावटीची 180 मि.लि. व 750 मि.लि. च्या गोल्डन अंश ब्ल्यू फाईन व्हिस्कि, रॉयल क्लासीको माल्ट व्हिस्की, मॅकडाल नं.1 रिझर्ह व्हिस्की असे एकूण 128 बॉक्समध्ये मद्य आढळून आलं. एकूण मुद्येमालाची किंमत 7 लाख 72 हजार 800 रुपये एवढी असून याप्रकरणी मालक निहार हेमंत वारणकर, रा.मु.पो.लोटेमाळ म्हसोबावाडी ता.खेड जि.रत्नागिरी यास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. तसंच त्याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येत आहे. सदर कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क खेड़ विभागाचे प्रभारी निरीक्षक शंकर जाधव तसंच दु, निरीक्षक ही व्ही सकपाळ, दु.निरीक्षक चिपळूण एन.डी.पाटिल, सहा,दु, निरीक्षक आर बी.भालेकर, जवान ए. के.बर्वे तसेच चिपळूण कार्यालयाचे जवान-नि-वाहन चालक ए.वही.वसावे, लोटे गावाचे तंटामुक्ती अध्यक्ष चाळके यांनी भाग घेतला. या प्रकरणी पुढील तपास निरीक्षक शंकर जाधव करत आहेत.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Ratnagiri, Ratnagiri police

पुढील बातम्या