Home /News /maharashtra /

शिर्डी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवलच घडलं, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेने दिला भाजपला पाठिंबा

शिर्डी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवलच घडलं, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेने दिला भाजपला पाठिंबा

मनसे आणि अपक्ष यांचा पाठींबा मिळाल्याने भाजपाचे शिवाजी गोंदकर शिर्डीच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध विराजमान झाले आहेत. त्यामुळे शिर्डीत नवलाईचं राजकारण घडल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

शिर्डी 04 डिसेंबर: शिर्डीच्या नगरपंचायतीवर (Shirdi nagar panchayat) भाजपाचा (BJP) झेंडा फडकलाय आहे. भाजपाचे अवघे तीन नगरसेवक असताना शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि अपक्ष यांचा पाठींबा मिळाल्याने भाजपाचे शिवाजी गोंदकर शिर्डीच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध विराजमान झाले आहेत. त्यामुळे शिर्डीत नवलाईचं राजकारण घडल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. सर्वांचेच लक्ष लागलेल्या शिर्डीच्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या तीकिटावर निवडून आलेल्या शिवाजी गोंदकर यांचा विजय झाला आहे. काँग्रेसमध्ये असताना विखे पाटील यांचे 17 पैकी 9 नगरसेवक निवडून आले होते आणि त्यांची सत्ता नगरपंचायतवर आली त्यावेळी भाजपा विरोधी पक्षात होती. आता मात्र भाजपाचे अवघे 3 नगरसेवक असताना, मनसेचा 1, शिवसेना 1, अपक्ष 2 आणि काँग्रेसचे 3 समर्थक शिवाजी गोंदकर यांच्यासोबत आल्याने विखे पाटील समर्थक असलेल्या जगन्नाथ गोंदकर यांना आपला अर्ज मागे घ्यावा लागला. नगराध्यक्षपदासाठी निवडणूकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला असला तरी त्यांचे समर्थक नगरसेवक काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले आहेत. विखे पाटील यांनी जगन्नाथ गोंदकर यांना नगराध्यक्ष पदाची संधी देण्याचं ठरवलं खरं मात्र शिवाजी गोंदकर यांनी सर्वपक्षीय पाठींबा मिळवून नगराध्यक्ष पदाची माळ आपल्या गळ्यात पाडली. शेवटच्या क्षणी विखे पाटील समर्थक असलेल्या जगन्नाथ गोंदकर यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने शिवाजी गोंदकर यांची शिर्डीच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झालीय. ‘तीन चाकांच्या रिक्षाने बुलेट ट्रेनला हरवलं’, फडणविसांवर शिवसेनेचा पलटवार शिर्डी नगरपंचायतची निवडणूक एक वर्षानंतर होणार आहे मात्र सत्तेच्या समीकरणात अडीच वर्षे, सव्वा सव्वा वर्ष नगराध्यक्षपद असे ठरले होते. त्यानुसार पहिली अडीच वर्षे विखे समर्थक काँग्रेसच्या योगिता शेळके नगराध्यक्ष झाल्या. त्यानंतर सव्वा वर्ष अर्चना कोते यांना संधी मिळाली. तर आता सव्वा वर्षासाठी भाजपचे शिवाजी गोंदकर नगराध्यक्ष झाले आहेत. विखे पाटीलही आता भाजपातच असल्याने त्यांनी स्थानिक विरोध बाजूला ठेवत आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतलाय. शिवाजी गोंदकर नगराध्यक्ष होण्यासाठी नगरसेवक सुजीत गोंदकर आणी अभय शेळके यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Shirdi (City/Town/Village)

पुढील बातम्या