जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिंदे सरकारचा मोठा निर्णय, केंद्राची मोठी योजना महाराष्ट्रात लागू करणार

शिंदे सरकारचा मोठा निर्णय, केंद्राची मोठी योजना महाराष्ट्रात लागू करणार

शिंदे सरकारचा मोठा निर्णय

शिंदे सरकारचा मोठा निर्णय

मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 14 फेब्रुवारी : आजच्या मंत्रीमंडळ बैठकीतील मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाने महाराष्ट्रातील शाळांचं पूर्ण स्वरूपच बदलणार आहे. केंद्र सरकारच्या पीएमश्री योजना महाराष्ट्रात लागू करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री स्कूल फॉर रायजिंग इंडिया महाराष्ट्रात राबवण्यासंदर्भात मंत्री मंडळ बैठकीत चर्चा झाली. योजनेच्या अंमलबजावणीसाठी मंत्र्यांमध्ये खलबते सुरू होती. केंद्र सरकारने सप्टेंबर 2022 रोजी योजनेची घोषणा केली आहे. या अंतर्गत देशात 14 हजार 597 शाळा सुरू करण्यात येणार आहे. या शाळा आदर्श शाळा म्हणून ओळखल्या जातील. देशातील 18 लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. काय आहे पीएमश्री योजना? - या शाळेत नवीन तंत्रज्ञान, स्मार्ट क्लास, खेळ आणि आधुनिक पायाभूत सुविधा यावर विशेष लक्ष देण्यात येईल. - शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे, राज्यातील साक्षरतेचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. - विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी ही उपायोजना सुचवल्या जातील. - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या शाळांच्या माध्यमातून अंमलात आणले जाईल. - केंद्र सरकारच्या या पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यात करण्याचा प्रयत्न आहे. - वास्तविक जीवनाशी निगडित प्रात्यक्षिक शिक्षण देण्याचा प्रयत्न या योजनेत आहे. - स्मार्ट क्लास, ग्रंथालय, कौशल्य प्रयोग शाळा, खेळाचे मैदान, विज्ञान प्रयोगशाळा अशा आधुनिक सोयी व सुविधा असतील.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात