मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /खरंच शीनाबोरा अजून जीवंत आहे का? CBI च्या दोन शब्दांनी प्रकरणाला पूर्णविराम मिळणार?

खरंच शीनाबोरा अजून जीवंत आहे का? CBI च्या दोन शब्दांनी प्रकरणाला पूर्णविराम मिळणार?

सीबीआयने कथित शीना बोरा जिवंत असल्याच्या दाव्यावर रिप्लाय दिला आहे.

सीबीआयने कथित शीना बोरा जिवंत असल्याच्या दाव्यावर रिप्लाय दिला आहे.

सीबीआयने कथित शीना बोरा जिवंत असल्याच्या दाव्यावर रिप्लाय दिला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 12 जानेवारी : देशभरात शीना बोरा हत्या प्रकरण अजूनही गाजत आहे. शीना बोरा जिवंत असल्याचा दावा दुसऱ्यांदा करण्यात आला आहे. तसेच 5 जानेवारीला शीना बोरा गुवाहाटीमध्ये होती का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. सकाळी पावणेसहाच्या सुमारास कथित शीना बोरा दिसली होती, असे मुखर्जी परिवारातील परिचित सविना बेदी या महिलेनं शीनाला पाहिल्याचं सांगितलं होतं. मात्र, यानंतर शीना बोरा जिवंत असल्याच्या दाव्यावर आता सीबीआयने रिप्लाय दिला आहे.

सीबीआयने कथित शीना बोरा जिवंत असल्याच्या दाव्यावर रिप्लाय दिला आहे. सीबाआयने म्हटले की, शीना बोराचा मृत्यू झाला आहे. तसेच त्यासंदर्भातील सक्षम पुरावे आहेत. तसेच या पुरव्यांना शास्त्रीय आधारही आहे. शामवर रायने कन्फेस केले आहे. त्यामुळे शीना बोरा जिवंत आहे, असा दावा हा काल्पनिक आहे. तसेच गुवाहाटी विमानतळावरील CCTV FTG चेक करण्याची गरज नाही, असेही सीबीआयने म्हटले आहे.

दरम्यान, शीना बोरा हिला पाहिल्याचा दावा करणाऱ्या सविना या INX मीडियाच्या माजी वकील होत्या. याप्रकरणी सविना यांनी कथित शीनाचा विमानतळावरचा व्हिडिओदेखील काढला. थांबवण्याचा प्रयत्न करताच कथीत शीना गायब झाली. सविना बेदी यांनी प्रतिज्ञापत्रासह कोर्टात अर्ज सादर केला. या अर्जाच्या आधारावर तपास अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश द्या, अशी मागणी अर्जात करण्यात आली होती.

गुवाहाटी एअरपोर्टला नोटीस -

दरम्यान, आता इंद्राणी मुखर्जीचा अर्जावर विशेष CBI कोर्टानं गुवाहाटी एअरपोर्टला नोटीस जारी केली आहे. तसेच गुवाहाटी एअरपोर्ट वरील CCTV फुटेज आणि प्रवाशांची यादी कोर्टासमोर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. फुटेजची गरज नाही, असा CBI नं कोर्टात लेखी खुलासा दिल्यानंतर न्यायालयाने हे आदेश दिले.

हेही वाचा - सत्यजीत तांबेंनी 'गेम' फिरवला, नाशिक विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्वीस्ट

शीना बोरा हत्या प्रकरण

24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. शीना बोरा हत्या प्रकरण उघडकीस आले जेव्हा इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर श्यामवर राय याला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने उघड केले की तो दुसर्‍या प्रकरणात सामील होता आणि तो एका खुनाचा साक्षीदार आहे.

श्यामवर राय यांनी मुंबई पोलिसांना सांगितले की, इंद्राणी मुखर्जीने 2012 मध्ये शीना बोरा हिचा गळा दाबून खून केला होता. ड्रायव्हरनं दिलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारावर इंद्राणीला 2015 मध्ये अटक करण्यात आली. अधिक तपासात समोर आले की शीना इंद्राणीची पहिली मुलगी होती आणि ती तिच्या आईला मुंबईत घर मिळवून देण्यासाठी तिला ब्लॅकमेल करत होती.

मुंबई पोलीस आणि नंतर सीबीआयच्या म्हणण्यानुसार, इंद्राणी मुखर्जीने तिची दोन मुले शीना आणि मिखाईल यांना सोडून दिलं होतं. मीडिया एक्झिक्युटिव्ह पीटर मुखर्जी यांच्याशी लग्न केल्यानंतर तिनं एका मासिकात स्वतःचा फोटो पाहिला तेव्हा शीनाला तिच्या आईबद्दल माहिती मिळाली.

त्यानंतर इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि शामवर राय यांनी मिळून पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली आणि त्यांच्याच मदतीनं 25 एप्रिल 2012 रोजी तिच्या मृतदेहाची विल्टेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये अखेर हे प्रकरण सर्वांसमोर उघड झालं.

First published:

Tags: CBI, Murder Mystery, Sheena murder case