मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /राहुल गांधींवर टीका करताना पोंक्षेंची जीभ घसरली, म्हणाले दिल्लीतील गाXX काहीही बडबडतो

राहुल गांधींवर टीका करताना पोंक्षेंची जीभ घसरली, म्हणाले दिल्लीतील गाXX काहीही बडबडतो

राहुल गांधी यांच्यावर टीका करताना शरद पोंक्षे यांची जीभ घसरली आहे. शरद पोंक्षे यांच्या या वक्तव्यावरून आता काँग्रेस आक्रमक होण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी यांच्यावर टीका करताना शरद पोंक्षे यांची जीभ घसरली आहे. शरद पोंक्षे यांच्या या वक्तव्यावरून आता काँग्रेस आक्रमक होण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी यांच्यावर टीका करताना शरद पोंक्षे यांची जीभ घसरली आहे. शरद पोंक्षे यांच्या या वक्तव्यावरून आता काँग्रेस आक्रमक होण्याची शक्यता आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Thane, India

मुंबई, 6 जानेवारी :  काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अनेकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावरून अभिनेते शरद पोंक्षे यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मात्र राहुल गांधी यांच्यावर टीका करताना शरद पोंक्षे यांची जीभ घसरली आहे. शरद पोंक्षे यांच्या या वक्तव्यावरून आता काँग्रेस आक्रमक होण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले पोंक्षे? 

राहुल गांधी यांच्यावर टीका करताना शरद पोंक्षे यांची जीभ घसरली. 'कुणीतरी दिल्लीतला  गाढव आणि मूर्ख मुलगा काहीही बडबडतो, पण त्याचे मी आभार मानतो कारण त्या मुर्खामुळे थंड असणारा हिंदू समाज जागृत होत आहे.  ज्याला आपल्या आजीचा इतिहास माहीत नाही, त्याला सावरकरांचा इतिहास कसा माहीत असेल? इंदिरा गांधींनी स्वतःच्या कार्यकाळात सावरकरांचा सन्मान केला होता. महात्मा गांधीही सावरकर यांचा सन्मान करत होते. त्यामुळे त्या मुलाच्या कुवतीपलीकडे सावरकर आहेत.' अशा शद्बात अभिनेते शरद पोंक्षे यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे.

'सावरकरांचे विचार महत्त्वाचे'  

ठाण्यात एका कार्यक्रमादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पोंक्षे यांनी हे वक्तव्य केलं आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की,  'आपण जर आज गप्प बसलो तर उद्या खोटा इतिहासच रूढ होईल. त्यामुळे खोटा ईतिहास सांगणाऱ्यांना वैचारिक पातळीवर वेळोवेळी ठोकून काढायलाच पाहिजे. सावरकरांचे विचार देशासाठी महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रात येऊन सावरकरांचा अवमान करण्याची पुन्हा कोणाची हिंम्मत होता कामा नये'.

First published:

Tags: Congress, Rahul gandhi, Savarkar, Sharad ponkshe