मुंबई, 4 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पक्षातील नेत्यांसोबत कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. या निर्णयानंतर कार्यकर्त्यांनी मुंबईतील वाय. बी सेंटरच्या बाहेरच उपोषण सुरू केलं. या कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यासाठी खुद्ध शरद पवार आज आले होते. पवारांनी कार्यकर्त्यांची भूमिका ऐकून घेत आपली भूमिका मांडली. काय म्हणाले शरद पवार? जो काही निर्णय मी घेतला तो पक्षाच्या भवितव्यासाठी घेतला आहे. उद्या पक्षाचे काम कसे चालणार, यासाठी निर्णय घेतला आहे. आम्ही जोपर्यंत भक्कमपणे त्यांच्या पाठीमागे आहोत, पक्ष शक्तिशालीपणे उभा करावा, हा त्याचा हेतू होता. पण ही गोष्ट खरी आहे, असा निर्णय घेत असताना आधी सहकाऱ्यांची चर्चा करावी लागते. पण मला खात्री होती, मी तुम्हा लोकांशी चर्चा केली असती तर तुम्ही हो कधी म्हटलं नसतं. आणि त्यामुळे तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेतला नाही. देशभरातून अनेक तुमचे सहकारी आले होते, त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे. बाहेरच्या लोकांशी चर्चा करून एक ते दोन दिवसांमध्ये निर्णय घेऊ. कार्यकर्त्यांची जी भावना आहे, ती दुर्लक्षित केली जाणार नाही. एवढंच मी तुम्हाला सांगतो, दोन दिवसांच्या नंतर तुम्हाला असं बसावं लागणार नाही, असं शेवटी शरद पवार म्हणाले. वाचा - मोठी बातमी! 11 मे नंतर राज्यात नवं सरकार स्थापन होणार? राजकीय तज्ज्ञांचा मोठा दावा शरद पवारांचा निर्णय अनेकांसाठी धक्का शरद पवार यांच्या राजीनाम्याचा अर्थ काढायचा झाला तर, त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांनी सर्वप्रथम महाराष्ट्रातील त्यांच्या कट्टर समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना मुंबईत बोलावले. सर्वपक्षीय नेत्यांना वायबी चव्हाण केंद्रात बोलावण्यात आले. कार्यक्रम संपण्यापूर्वीच शरद पवार यांनी अचानक राजीनामा देण्याचा मास्टरस्ट्रोक खेळला. यानंतर शरद पवार यांच्या समर्थक आणि नेत्यांनी प्रसारमाध्यमांसमोर राजीनामा मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली. यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. हा सर्व प्रकार प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांसमोर घडत होता, कारण पुस्तकाच्या प्रकाशनाला संपूर्ण मीडिया उपस्थित होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.