जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'भाजप नेत्यांना खोट्या गुन्हात अडकवण्यासाठी..' शंभुराजे देसाईंचा मोठा खुलासा, म्हणाले फडणवीस

'भाजप नेत्यांना खोट्या गुन्हात अडकवण्यासाठी..' शंभुराजे देसाईंचा मोठा खुलासा, म्हणाले फडणवीस

शंभुराजे देसाईंचा मोठा खुलासा

शंभुराजे देसाईंचा मोठा खुलासा

मविआ काळात देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांना खोट्या गुन्हात अडकवण्याचा डाव आखल्याच्या आरोपात तथ्य असल्याचे वक्तव्य राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी केलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 फेब्रुवारी : मविआ काळात देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांना खोट्या गुन्हात अडकवण्याचा डाव आखल्याच्या आरोपात तथ्य होते. मात्र, त्यावर देवेंद्र फडणवीसच जास्त बोलतील, असे मत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई यांनी मांडले आहे. सत्ता गेल्याच्या अस्वस्थतेमुळे विरोधी पक्षनेते अजित पवार बेछूट आरोप करत आहेत, असे देसाई म्हटले. यावेळी पत्रकार वारिसे यांच्या हत्येमध्ये सहभागी कोण असेल तर कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. पोलीस तपासात जे पुढे येईल त्यावर कारवाई होईल, असे मत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागात सध्या अपुरा कर्मचारी वर्ग आहे. पण भविष्यात राज्य लोकसेवा आयोगामार्फत पदे भरली जातील. गोवा बनावटीची दारू अथवा बनावट दारूवर पूर्वीपेक्षा अधिक कारवाई या महिन्यात झाली आहे. फ्लाईंग स्कॉडसह ड्रोनचा वापरही अशा अवैध व्यवसायावर कारवाईसाठी केला जाणार असल्याची माहिती देसाई यांनी दिली. वाचा - 2024 ला स्वराज्य लढणार.. संभाजीराजे छत्रपतींनी थोपटले दंड; नाशिकमध्ये केली मोठी घोषणा काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस? “मी यांच्या बापाला कधीही घाबरलो नाही. मला जेलमध्ये टाकण्यासाठी जंगजंग पछाडलं होतं. मात्र, मी जेलमध्ये गेलो नाही. ज्यांच्यावर जबाबदारी होते, तेच जेलमध्ये गेले”, असा घणाघाती आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. भाजपची नाशिकमध्ये महत्त्वाची कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री, आमदार, खासदारांना मार्गदर्शन केलं. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही संकप्ल करण्यात आला.

News18लोकमत
News18लोकमत

आम्ही 2024 साठी 20-20 ची बॅटिंग सुरू केली आहे. आगामी निवडणुका शिंदे आणि आम्ही एकत्रित लढू आणि जिंकू देखील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. जी जबाबदारी भाजपमध्ये आपल्याला मिळाली त्याच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्तीची सेवा करणे हा आपला धर्म आहे. ज्या योजना आपण बोलत आहोत. या सर्व योजना अन्‍त्‍योदयाच्या आहेत. आपल्याला काही गोष्टींचा त्याग करायला हवा. यामध्ये अहंकाराचा त्याग पहिल्यांदा करावा लागेल. तरच खऱ्या अर्थाने सर्मपण दिन साजरा करू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात