जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Shambhuraj Desai : उरलेले सर्व आमदार शिंदे गटात सामील होणार 'या' मंत्र्यांनी केला गौप्यस्फोट

Shambhuraj Desai : उरलेले सर्व आमदार शिंदे गटात सामील होणार 'या' मंत्र्यांनी केला गौप्यस्फोट

Shambhuraj Desai : उरलेले सर्व आमदार शिंदे गटात सामील होणार 'या' मंत्र्यांनी केला गौप्यस्फोट

आमदार शंभुराज देसाई यांनी सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथे एका शाखेच्या उदघाटन प्रसंगी एक गौप्यस्फोट केल्याने पुढच्या खळबळ उडाली आहे. (Shambhuraj Desai)

  • -MIN READ Satara,Maharashtra
  • Last Updated :

सातारा, 04 सप्टेंबर : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीत सगळ्यात पहिल्यांदा बंडखोरी करणारे आमदार शंभुराज देसाई यांनी सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथे एका शाखेच्या उदघाटन प्रसंगी एक गौप्यस्फोट केल्याने पुढच्या खळबळ उडाली आहे. (Shambhuraj Desai) पुढील पंधरा दिवसात जिल्ह्यातील शिवसेनेचे 90 टक्के पदाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत येतील. त्याचबरोबर शिवसेनेचे उर्वरित 15 आमदारही आमच्याकडे येणे बाकी असल्याचे शंभुराज देसाई म्हणाले. यावेळी त्यांनी रहिमतपूरचे रहिवाशी नितीन बानुगडे पाटील यांच्यावरही निशाणा साधला.

जाहिरात

पुढील पंधरा दिवसात जिल्ह्यातील शिवसेनेचे 90 टक्के पदाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत येतील. त्याचबरोबर शिवसेनेचे उर्वरित 15 आमदारही आमच्याकडे येतील. ते पुढील एक महिन्यातच मुख्यमंत्री ना. शिंदे यांच्यासोबत असतील. त्या आमदारांच्या बरोबर माझी चर्चा झाली असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा :  Buldhana Sanjay Gaikwad : चून चून के, गिन गीन के मारे जायेंगे.. राड्यानंतर बंडखोर आमदार गायकवाड यांची पुन्हा धमकी

रहिमतपूर येथे नागरी सत्कार व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, जयवंत शेलार, माजी नगराध्यक्ष वासुदेव माने काका, अरुण माने, माजी उपनगराध्यक्ष सुखदेव माने, शिवसेना शहराध्यक्ष सागर माने यासह बहुसंख्य पदाधिकारी, युवा कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे पाटील यांचा नामोल्लेख टाळून ना. शंभूराज देसाई म्हणाले, रहिमतपूर शहराला यापूर्वी राज्यस्तरीय संपर्कप्रमुख पद असताना कधीही शिवसेनेचा साधा मेळावाही झालेला नाही, मात्र आज खऱ्या अर्थाने शिवसेनेचे कोणतेही पद नसताना माजी नगराध्यक्ष वासुदेव माने काका यांनी शाखा उदघाटन करत शिवसेनेचा मेळावा घेतला. यातच त्यांचे खरे कौतुक आहे. रहिमतपूर नगर पालिकेवर भगवा फडकवण्यासाठी वासुदेव माने काका यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.  

जाहिरात

हे ही वाचा :  धनंजय मुंडेंविरोधात पक्ष काढण्यासाठी घेतले होते पैसे, करुणा शर्मांविरोधात गुन्हा दाखल

रहिमतपूरची वास्तव परिस्थिती व वातावरण मला चांगलेच माहिती आहे. येथे आरेला कारे करण्याची व अंगावर आला तर शिंगावर घेण्याची तयारी असणारी ही शिवसेना आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे. वासुदेव माने काका यांच्या पाठीमागे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची ताकद उभी करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. वासुदेव माने म्हणाले, केवळ राजकीय हेतूने रहिमतपूर नगरपालिकडे दुर्लक्ष केले गेले आहे. पाहिजे तितक्या प्रमाणात रहिमतपूर शहराचा सर्वांगीण विकास साध्य झाला नसल्याचे सांगितले. नगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी ना. शंभूराज व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताकद द्यावी. आभार भगवान माने यांनी मानले.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात