मराठी बातम्या /बातम्या /देश /

महाराष्ट्र पासिंग कारने देवदर्शनाला जाणाऱ्या 12 भाविकांना चिरडलं

महाराष्ट्र पासिंग कारने देवदर्शनाला जाणाऱ्या 12 भाविकांना चिरडलं

देवदर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना भरधाव कारने चिरडलं, ही कार महाराष्ट्र पासिंग असल्याची माहिती मिळाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Kranti Kanetkar

अहमदाबाद, 2 सप्टेंबर : रस्ते अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. धक्कादायक घटना समोर आली आहे. भरधाव कारने 12 लोकांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 6 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा- चौकात घडला दुचाकीचा अपघात, दोन बाईक एकमेकांना अशाकाही धडकल्या की... पाहा VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार हे भाविक पायी अंबाजी दर्शनासाठी चालत निघाले होते. त्याचवेळी भरधाव कारने त्यांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. या अपघाताचं नेमकं कारण समजू शकलं नाही. ही कार महाराष्ट्र पासिंग असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

हेही वाचा- गर्दी म्हणून चालत्या बसबाहेर लटकले; 8 सेकंदात जे घडलं ते पाहून धडकी भरेल

मिळालेल्या माहितीनुसार MH 03 CK 0178 या महाराष्ट्र पासिंग असलेल्या भरधाव कारने 12 भाविकांना चिरडलं आहे. हे पंचामहालच्या कालोल भागातील रहिवासी आहेत. कारची धडक एवढी भयंकर होती की यामध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले.

First published:

Tags: Gujrat, Maharashtra News, Road accident