मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धक्कादायक: उच्चभ्रू सोसायटीत भामटा करता होता लहान मुलांसोबत लैंगिक चाळे

धक्कादायक: उच्चभ्रू सोसायटीत भामटा करता होता लहान मुलांसोबत लैंगिक चाळे

आदर्श पार्क परिसरातील उच्चभ्रु सोसायटीच्या मोकळ्या जागेत खेळणाऱ्या मुलांसोबत एक भामटा लैंगिक चाळे करत होता.

आदर्श पार्क परिसरातील उच्चभ्रु सोसायटीच्या मोकळ्या जागेत खेळणाऱ्या मुलांसोबत एक भामटा लैंगिक चाळे करत होता.

आदर्श पार्क परिसरातील उच्चभ्रु सोसायटीच्या मोकळ्या जागेत खेळणाऱ्या मुलांसोबत एक भामटा लैंगिक चाळे करत होता.

भिवंडी,4 फेब्रुवारी:लहान मुलांसोबत लैंगिक चाळे करणाऱ्या विकृत तरुणाच्या हाता पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुलांच्या प्रसंगावधनाने पोलिसांनी भामट्याला चांगलाच धडा शिकवला. भिवंडी शहरात आदर्श पार्क परिसरातील उच्चभ्रू सोसायटीच्या मोकळ्या जागेत खेळणाऱ्या मुलांसोबत एक भामटा लैंगिक चाळे करत होता. ही बाब पीडित मुलांनी आपल्या पालकांना सांगितली. पालकांनी प्रसंगावधान राखून इमारत परिसरात सुरक्षिततेसाठी लावलेले सीसीटीव्ही तपासले. मुलांनी केलेली तक्रार खरी निघाली. पालकांनी निजामपुरा पोलिस स्टेशन गाठून या प्रकाराबाबत तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेऊन नझराना कंपाऊंड येथील राधाकृष्ण सोसायटीच्या इमारतीत राहणारा कमलेश शांतीलाल जैन या 36 वर्षीय विकृत भामट्याच्या मुसक्या आवळून त्याच्या हाता बेड्या ठोकल्या.

मिळालेली माहिती अशी की, आदर्श पार्क या परिसरातील 4 ते 9 वर्ष दरम्यानची लहान मुले-मुली इमारत परिसरात कुत्र्यासोबत खेळत असतानाच एक डोक्यावर टोपी घातलेला विकृत तरुण आपले गुप्तांग बाहेर काढून त्या ठिकाणी आला. त्याने तेथील लहान मुलांसोबत लैंगिक चाळे करण्याचा प्रयत्न केला. मुले घाबरली. ती घरी पळून गेली. मुलांच्या मनात विकृत तरुणाविषयी भीती निर्माण झाली होती. रात्री आईने मुलास कपडे बदलण्यास सांगितले असता त्याने घाबरून अंकल येईल, असे सांगत कपडे बदलण्यास नकार दिला. पालकांनी मुलांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.

मुलांच्या तक्रारीनंतर पालकांनी या घटनेची खातरजमा करण्यासाठी इमारत परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यात विकृतीचे किळसवाणा प्रकार समोर आल्यावर पालकांनी निजामपुरा पोलिस ठाणे गाठून आपल्या मुलांची कैफियत मांडली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेचच्या आधारे विकृत कमलेश शांतीलाल जैन यास त्याच्या घरातून अटक केली. त्याच्या विरोधात भादंवि कलम 354 सह पोस्को कायद्यांतर्गत कलम 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला भिवंडी कोर्टात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक बाजीराव भुसारे करत आहेत.

First published:

Tags: Thane police