माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत येण्याची शक्यता

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत येण्याची शक्यता

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अडचणीत येण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 27 फेब्रुवारी : फडणवीस सरकारच्या कालावधीत सिडकोबाबतच्या काही प्रकरणावरून कॅगने ताशेरे ओढल्याची चर्चा आहे. याबाबत कॅबिनेट बैठकीत झाल्याची माहिती समोर आली आहे. कॅबिनेटमध्ये कॅगचा अहवाल सादर करण्यात आल्याचीही माहिती आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अडचणीत येण्याची शक्यता आहे.

फडणवीस सरकारच्या काळात सीडकोमध्ये घोटाळा झाल्याची कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आहे. सिडकोवर कॅगने ताशेरे ओढले आहेत. सीडकोमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा कॅगचा अहवाल आहे. हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा ठपका कॅगने ठेवल्याची माहिती आहे. त्यावर कॅबिनेटमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याचं कळतंय. त्यामुळे या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस आणि भाजपला अडचणीत पकडण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विधानसभेत धुमशान

सभागृहाचं कामकाज सुरू असताना घडलेल्या एका किस्स्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 'दोन्ही दादा... अजित दादा असो की चंद्रकांत दादा दोन्ही संवेदनशील, ठोस तात्काळ निर्णय घेतात,' असं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं. त्यानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे घेतलेल्या शपथविधीवर भाष्य करत टोला लगावला.

'ते ठोस निर्णय घेतात. रातोरात शपथ घेतात, हे आम्ही बघितले असा टोला चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना लगावला. चंद्रकांत पाटील यांनी आपल्यावर शेरेबाजी केल्याचं कळताच अजित पवार हेदेखील पलटवार करण्यासाठी सज्ज झाले. 'तुम्ही रातोरात विषय काढला म्हणून बोलतो...' असं म्हणत अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली.

मात्र त्याचवेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी अजित पवार यांना उद्देशून खालून म्हटले की 'तुम्ही ऐकू नका आणि मीही ऐकत नाही.' त्यावर 'आता फडवणीस साहेब तुम्हीच बोलला म्हणून मी बोलत नाही,' असं म्हणत अजित पवार यांनी पहाटे घेतलेल्या शपथविधीवर अधिक बोलणं टाळलं.

First published: February 27, 2020, 8:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading