मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Maharashtra Assembly Monsoon Session : विधानभवनात शिंदे गटाची माघार, सेनेचं कार्यालय सोडलं; व्हिपवरून मात्र जुंपली

Maharashtra Assembly Monsoon Session : विधानभवनात शिंदे गटाची माघार, सेनेचं कार्यालय सोडलं; व्हिपवरून मात्र जुंपली

पक्ष कार्यालयाचा वाद टाळण्यासाठी शिंदे गटाने सातव्या मजल्यावर वेगळे कार्यालय स्थापन केले आहे.

पक्ष कार्यालयाचा वाद टाळण्यासाठी शिंदे गटाने सातव्या मजल्यावर वेगळे कार्यालय स्थापन केले आहे.

पक्ष कार्यालयाचा वाद टाळण्यासाठी शिंदे गटाने सातव्या मजल्यावर वेगळे कार्यालय स्थापन केले आहे.

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 17 ऑगस्ट : शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिले पावसाळी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनामध्ये शिवसेना आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमनेसामने आले आहे. पण, पक्ष कार्यालयाचा वाद टाळण्यासाठी शिंदे गटाने सातव्या मजल्यावर वेगळे कार्यालय स्थापन केले आहे. त्यामुळे विधिमंडळात शिवसैनिकांचे दोन गट तयार झाले आहे. पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने शिवसेना आणि शिंदे गटामध्ये व्हीप जारी करण्यावरून दावे प्रतिदावे केले जात आहे. आम्ही जारी केलेला व्हिप सर्व शिवसेना आमदारांना लागू होईल. दप्तरी नोंद असल्याने प्रमाणे नियमानुसार माझी प्रतोद म्हणूनच नियुक्ती आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना देखील व्हिप लागू होईल, असा दावा सुनील प्रभू यांनी केला आहे. तर, शिंदे गटाचे नेते गोगावले यांनी शिंदे गटाचा व्हिप हा लागू असणार आहे. हा वाद कोर्टामध्ये आहे, त्यामुळे आम्ही जास्त बोलणार नाही, असं गोगावले यांनी सांगितलं. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला विधान भवनातील सातव्या मजल्यावर पक्ष कार्यालय मिळाले आहे. शिवसेनेचे असलेल्या कार्यालयामध्ये शिंदे गटाच्या आमदारांनी जाण्याचं टाळलं आहे. त्यामुळे विधिमंडळामध्ये दोन शिवसेना कार्यालय तयार झाली आहे. विधान भवनातील तिसऱ्या मजल्यावरील शिवसेना पक्ष कार्यालय ठाकरे गटाकडेच राहणार आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी जारी केलेला व्हिप शिंदे गटातील आमदारांना लागू होणार का? शिंदे गटाचे प्रतोद हे भरत गोगावले यांनी जारी केलेला व्हिप शिंदे गटातील आमदारांना लागू होणार का? अधिवेशन काळात अनेक विधेयके मंजुरीसाठी येणार, धोरणात्मक बाबीही चर्चेसाठी येतील. अशा वेळी आम्ही जी भूमिका घेऊ ती शिवसेनेच्या सर्व आमदारांसाठी लागू असेल असा ठाकरे गटाचा दावा आहे. गोगावलेंचा व्हिप कायद्यानुसार, गोगावलेंना विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिल्याने प्रभू यांच्या व्हिपला अर्थ उरलेला नाही, असा दावा शिंदे गटाचा आहे. त्यामुळे आता व्हिप कोण कुणाचा मानणार हे पाहण्याचं ठरणार आहे.
First published:

पुढील बातम्या