जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सहकारातील ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक यांचे कोरोनामुळे निधन, पुण्यातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

सहकारातील ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक यांचे कोरोनामुळे निधन, पुण्यातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

सहकारातील ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक यांचे कोरोनामुळे निधन, पुण्यातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

सुधाकर परिचारक हे राज्याच्या राजकारणातील एक दिग्गज नेते म्हणून ओळखळे जात.

  • -MIN READ
  • Last Updated :

पंढरपूर, 18 ऑगस्ट : सहकारातील ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक यांचे पुणे येथे सोमवारी रात्री निधन झालं आहे. 5 ऑगस्ट रोजी सुधाकरपंत परिचारक यांना कोरोना आजाराची लक्षणे दिसून आली. त्यामुळे त्यांच्यावर पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारही सुरू करण्यात आले होते. मात्र श्वसनाच्या विकारामुळे रविवारपासून परिचारक अत्यवस्थ होते. अखेर सोमवारी रात्री साडेअकरा वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय आदेशानुसार त्यांचे पार्थिवावर पंचवीस लोकांच्या उपस्थितीतच पुणे येथील वैकुंठभूमी येथे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय परिचारक कुटुंबीयांनी घेतला आहे. सर्व कार्यकर्त्यांनी व जनतेने संयम व धीर धरावा ही विनंती,’ असं आवाहन त्यांचे नातू प्रणव परिचारक यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं आहे. शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी ते भाजप प्रवेश सुधाकर परिचारक हे राज्याच्या राजकारणातील एक दिग्गज नेते म्हणून ओळखळे जात. ते तब्बल 25 वर्षे विधानसभेचे सदस्य होते. तसंच त्यांनी अनेक वर्ष महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात देखील त्यांनी भरीव योगदान दिले. काँग्रेसमध्ये दिवंगत वसंतदादा पाटील तर पुढे राष्ट्रवादीत शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून परिचारक यांच्याकडे पाहिले जात होते. 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. परिचारक यांच्या मृत्यूनंतर नातवाचं आवाहन सुधाकर परिचारक यांच्यावर पुणे येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. या संकटप्रसंगी त्यांना मानणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा असे त्यांचे नातू युवानेते प्रणव परीचारक यांनी आपल्या एका फेसबुक पोस्टद्वारे आवाहन केलं आहे. “आपणास कळविण्यास अत्यंत दुःख वाटते की…आपल्या परिचारक परिवाराचे, पांडुरंग परिवाराचे… अनेक सर्वसामान्य जनतेचे कुटुंबप्रमुख…आधारवड…. श्रध्दास्थान…. व्यक्तिमत्व… माझा आधार… माझे आजोबा…वंदनीय सुधाकरपंत परिचारक … तथा …“मोठे मालक”… यांचे काल रात्री 11.35 रोजी कोविड सारख्या आजाराने पुणे येथे दु:खद निधन झाले. गेले काही दिवस शेवटच्या क्षणापर्यंत अनेक डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न … आपणा सर्वांच्या “प्रार्थना” त्यांचे प्राण वाचवू शकले नाहीत. नियतीच्या या अनाकलनीय निर्णयासमोर शेवटी सर्वांना हात टेकावे लागले. ज्यांच्या आधाराने व्यक्तिशः मी समाजापुढं या राजकारणात… समाजकारणात… पाऊल टाकले… त्या “मोठ्या मालकांबद्दल” आपल्या ही दु:खदायक बातमी सांगताना माझ्या मनाला अत्यंत क्लेश होत आहेत.“जो आवडतो सर्वांना….तोचि आवडे देवाला…” कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय आदेशानुसार त्यांचे पार्थिवावर पंचवीस लोकांच्या उपस्थितीतच पुणे येथील वैकुंठभूमी येथे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय परिचारक कुटुंबीयांनी घेतला आहे. सर्व कार्यकर्त्यांनी व जनतेने संयम व धीर धरावा ही विनंती,” असं आवाहन प्रणव परिचारक यांनी केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात