मुंबई, 16 मार्च : जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. आज सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिसरा दिवस आहे. सरकारकडून देखील हा संप मागे घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र संप अजूनही सुरूच आहे. आता हे प्रकरण हाय कोर्टात पोहोचलं आहे. ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तातडीच्या सुनावणीसाठी प्रयत्न गुणरत्न सदावर्ते यांनी हा संप बेकायदेशीर असल्याचा आरोप करत हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. मागण्या रास्त असून शकतात मात्र संप बेकायदेशीर असल्याचा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या याचिकेमध्ये केला आहे. या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी देखील सदावर्ते करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता न्यायालय या प्रकरणात काय निर्णय घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. संपामुळे सर्वसामांन्यांचे हाल जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. आज संपाचा तिसार दिवस आहे. जुन्या पेन्शन योजनेवरून कर्मचारी चांगलेच आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे सर्मसामान्यांचे चांगलेच हाल होत असल्याचं पहायला मिळत आहे. रुग्णालयातील कर्मचारी संपावर असल्यामुळे रुग्णांची गौरसोय होतीये. आता हाच मुद्दा पुढे करून ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मागण्या रास्त असून शकतात मात्र संप बेकायदेशीर असल्याचा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या याचिकेमध्ये केला आहे. या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी देखील सदावर्ते करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.