जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Mumbai rains : गरज असेल तरच बाहेर पडा, शाळांना उद्या सुट्टी, मुंबईत पावसाचा रेड अलर्ट!

Mumbai rains : गरज असेल तरच बाहेर पडा, शाळांना उद्या सुट्टी, मुंबईत पावसाचा रेड अलर्ट!

(मुंबईत पावसाचा रेड अलर्ट)

(मुंबईत पावसाचा रेड अलर्ट)

Mumbai rains : मुंबईमध्ये मागील दोन दिवसांपासून पावसाची सततधार सुरू आहे. बुधवारी सकाळपासून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान मुंबईत आता रेड अलर्ट देण्यात आला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 26 जुलै : मुंबईसह कोकण आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाने धुडगूस घातला आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबई महानगराला 26 जुलै रात्री 8 ते उद्या 27 जुलै दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. त्यामुळे उद्या गुरुवारी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. मुंबईमध्ये मागील दोन दिवसांपासून पावसाची सततधार सुरू आहे. आज सकाळपासून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान मुंबईत आता रेड अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसंच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसंच सर्व महाविद्यालयांना उद्या गुरुवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

जाहिरात

तसंच, सर्व मुंबईकर नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया सर्वांनी सतर्क रहावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे. तसंच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सुचनांचे पालन करावे, असं आवाहन करण्यात पालिकेकडून करण्यात आलं आहे. रत्नागिरीमध्येही शाळांना सुट्टी दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसंच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, यासाठी शाळा (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व माध्यमिक) विद्यालयांना उद्या गुरुवार दि. 27 जुलै रोजी सुट्टी जाहीर केल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज दिला. हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार, जिल्ह्यात उद्या गुरुवार दिनांक २७ जुलै रोजी रेड अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने तसंच खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे. संगमेश्वर येथील शास्त्री नदी, राजापूर येथील कोदवली नदीने इशारा पातळी ओळांडली आहे. जिल्ह्यात अनेक भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसंच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये यासाठी उद्या 27 जुलै रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: mumbai
  • First Published :
जाहिरात
जाहिरात