जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कसा आहे रोहित शेट्टीचा पहिला मराठी सिनेमा? कलाकारांनी सांगितलं रहस्य, पाहा Video

कसा आहे रोहित शेट्टीचा पहिला मराठी सिनेमा? कलाकारांनी सांगितलं रहस्य, पाहा Video

कसा आहे रोहित शेट्टीचा पहिला मराठी सिनेमा? कलाकारांनी सांगितलं रहस्य, पाहा Video

बॉलिवूडचा लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी आता मराठी सिनेमासृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झालाय.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 13 एप्रिल :बॉलिवूडचा लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी आता मराठी सिनेमासृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झालाय. ‘स्कुल कॉलेज आणि लाइफ’ या मराठी सिनेमाच्या माध्यमातून रोहित मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहे. तेजस्वी प्रकाश आणि करण परब यांची या सिनेमात मुख्य भूमिका आहे. तर, अष्टपैलू अभिनेता जितेंद्र जोशीही एका खास भूमिकेत या सिनेमात दिसणार आहे. 14 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रदर्शित होतोय. स्कूल कॉलेज आणि लाइफ या चित्रपटाच्या सुरुवातीलाच तेजस्वी प्रकाश मजा मस्ती- मस्ती करताना दिसत आहे. कॉलेजला गेल्यावर तेजस्वी एका मुलाच्या प्रेमामध्ये पडते. त्यांनतर त्यांची लव्हस्टोरी कोणत्या टप्प्यावर येऊन पोहोचते याचा अंदाज ट्रेलरमध्ये येत आहे. या सिनेमामध्ये तेजस्वी प्रकाशचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन विहान सूर्यवंशी याने केले आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    काय आहे संकल्पना? सिनेमाचे दिग्दर्शन विहान सूर्यवंशी यांनी या सिनेमाची संकल्पना समजावून सांगितली.  ‘शाळेतील दिवस सर्वांसाठी अविस्मरणीय असतात. कॉलेजमध्ये नवीन मित्र, नवीन जग तयार होत. त्यानंतर प्रत्येक जण एका वेगळ्या दिशेला जात असतो. कॉलेज संपल्यावर ते दिवस किती छान होते हे आपल्याला जाणवतं. या प्रवासातील आठवणींचा साठा म्हणजे हा चित्रपट आहे. हा चित्रपट पहिल्यानंतर प्रेक्षकांनी अनेक वर्षांपासून मनात असलेल्या शाळेतील , कॉलेज मधील मित्र मैत्रीणीना फोन करावा. आपल्या आठवणींना उजाळा द्यावा हा प्रामाणिक प्रयत्न या माध्यमातून केलाय.’ Video : अरूंधतीला देखील राहवलं नाही! मग काय कसबस करून टाकलं पहिलं ट्रेडिंग रील जितेंद्र जोशी यांनीही या चित्रपटाच्या कथेचं यावेळी कौतुक केलं.  ‘विहान सूर्यवंशीच्या तोंडून कथा ऐकल्यानंतर एक उत्तम प्रेमळ गोष्ट ऐकल्याचा आणि त्या गोष्टीतल्या तरुणाच्या प्रेमळ चाचाची भूमिका करण्याची  संधी मिळाल्याचा आनंद होतो. चाचाचं एका लहान मुलावर प्रेम असतं. तो मुलगा लहान असल्यापासून ते मोठा होईपर्यंतचा सर्व प्रवास या सिनेमात दाखवण्यात आला आहे. ही सहाय्यक अभिनेत्याची भूमिका असली तरी महत्त्वाच्या व्यक्तीचा रोल आहे, असं जितेंद्रनं सांगितलं. ‘हा पहिला सिनेमा असल्याने दर दिवस नवीन होता. दररोज वेगळं काही तरी होतं. यामध्ये निर्वाणची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात निर्वाण आणि चाचा हे नात खूप खास आहे. या चित्रपटात आयुष्याचे प्रत्येक टप्पे आहेत. आणि शेख चाचा दर टप्प्यात आहेत. हा खूप सुंदर अनुभव होता,’ असं अभिनेता करण परब यावेळी म्हणाला.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात