सातारा, 15 नोव्हेंबर : एचव्हीडीएस योजनेद्वारे महावितरण कृषी पंपांना दर्जेदार आणि अखंड पुरवठा करते. या योजनेची अंमलबजावणी झाली असून शेतकऱ्यांना वीजपुरवठा होत आहे. मात्र यात वारंवार डीपी जळू लागले आहे, डिओ तुटत आहेत. याचा नाहक त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. या प्रकल्पाचे काम खाजगी ठेकेदाराला देण्यात आले होते. मात्र हे काम योग्य झाले नाही, कामात अनेक त्रुटी आढळून येत असल्याचा आरोप साताऱ्यातील शेतकऱ्यांनी केला आहे.
गेल्या पाच वर्षापासून म्हणजेच 2017 पासून या योजने अंतर्गत शेती पंपाची वीज जोडणी सुरू आहे. मात्र, ती आजपर्यंत पूर्ण करण्यात आली नाही. जी कामे करण्यात आली आहेत ती देखील चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांना महावितरणच्या दारात फेऱ्या माराव्या लागत आहेत. गेली पाच वर्षे ही योजना खाजगी ठेकेदार विक्रांन या कंपनीला देण्यात आली. पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर ती महावितरणला वर्ग करण्यात येणार आहे. मात्र, या योजनेच्या अनेक तक्रारी असल्याने ती खाजगी ठेकेदार यांच्याकडून महावितरणकडे वर्ग करून घेऊ नये, अशी मागणी होत आहे.
शेती पंपास विद्युत पुरवठा करणारे विद्युत डीपी (रोहित्र) जळाल्यास त्याची दुरुस्ती करण्यासाठी शेतकऱ्यांना वर्गणी जमा करावी लागते. खाजगी वाहनाद्वारे कंपनीच्या कार्यालयात आणावे लागते. लग्ज, केबल, फ्युज, इन्सुलेटर या वस्तू खराब व नादुरुस्त झाल्यासही दुरुस्ती केली जात नाही. या कामासाठी नियुक्त कंपनीचा ठेकेदार याकडे दुर्लक्ष करत असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. विद्युत डीपीची देखभाल दुरुस्ती संबंधित ठेकेदाराची असून पाच वर्षेची जबाबदारी त्याची असताना तो स्वीकारत नाही. शेवटी महावितरण विभाग कर्मचारी, अधिकारी यांनाच याचा त्रास सहन करावा लागत आहे.
रंकाळा तलावाच्या नियोजित कामांना कोल्हापूरकरांचा विरोध, पाहा काय आहे प्रकरण! Video
डीपीची डिझाईन चुकीची
डीपीची डिझाईन चुकीची असून त्याची बॉडी लहान असल्याने ते जास्ती लोड आला की जाळून जात आहे. तसेच डिओ तुटत आहेत. या कारणांनी बाकी फिडरच्या लाइन बंद पडून घरगुती वीज पुरवठा खंडित होऊन सर्वसामान्य ग्राहकांना देखील याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे महावितरण साहाय्यक अभियंता दत्ता शिंदे यांनी सांगितले.
डीपी सहा महिन्यात 3 वेळा फेल
शेतकरी श्रीमंत जाधव यांनी त्यांच्या शेतात बसवलेला डीपी सहा महिन्यात 3 वेळा फेल झाला. याची देखभाल दुरुस्ती संबंधित ठेकेदार विक्रम कंपनीची असून त्यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे. तक्रार करून देखील हे ट्रान्सफॉर्मर बदलून मिळत नसल्यामुळे याचा नाहक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.