कोल्हापूर, 12 नोव्हेंबर : रंकाळा हा कोल्हापूर कर आणि बाहेरून येणाऱ्या पर्यटकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सध्या या तलावाच्या सुशोभीकरणाबाबत बरीच चर्चा रंगत आहे. रंकाळा तलावाच्या क्षेत्रातील तांबट कमानीजवळ महापालिकेतर्फे स्केटिंग ट्रॅक, तसेच इतर बांधकामांचा घाट घातला आहे. त्याला रंकाळाप्रेमींकडून तीव्र विरोध होत आहे. या नियोजित कामांना सोशल मीडियावरूनही तीव्र संताप व्यक्त झाला आहे. या प्रकरणी सर्व रंकाळा प्रेमींनी नुकतीच बैठक घेऊन पुढील दिशा ठरवण्यात आली आहे. जनआंदोलनाने नियमबाह्य कामे बंद पाडली जातील, असा इशारा प्रहार प्रतिष्ठानच्या अमर भोसले यांनी यावेळी दिला आहे. रंकाळा तलाव परिसरात सुशोभीकरणाच्या नावाखाली विद्रूपीकरण जर करण्याच्या दृष्टीने काही गोष्टी जर केली जाणार असतील तर रंकाळाप्रेमी म्हणून आमचा याला कायम विरोध राहील. रंकाळ्याचे वैभव जपण्यासाठी या कामांना विरोध करत आहोत. त्याचबरोबर या प्रकरणी हरित लवादामध्ये देखील दाद मागू अशी भूमिका यावेळी अमर यांच्या बरोबर असणाऱ्या रंकाळा प्रेमींकडून घेण्यात आली आहे. यासाठी आधीच महापालिकेच्या प्रशासकांना प्रहार प्रतिष्ठानच्या वतीने निवेदन देखील देण्यात आले आहे. रंकाळा संवर्धन व संरक्षण समितीनेही या कामाला विरोध दर्शवला आहे.
चुलीवरून थेट ताटात! ठिकपुर्लीची खास खवा बर्फी, Video पाहूनच तोंडाला सुटेल पाणी
रंकाळ्यातील पाणी प्रदूषण वाढून जलचर मृत्युमुखी पडत आहेत. पदपथ, रंकाळा उद्यान यांची दुरवस्था झाली आहे. चौपाटीवर जागोजागी फरशा निखळल्या आहेत. संरक्षक कठडा ढासळला आहे. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना या अशा अवस्थेत हा ऐतिहासिक रंकाळा तलाव बघायला मिळतो असे मत रंकाळ्यावर फिरायला आलेल्या एका नागरिकाने व्यक्त केले. तर नियोजित कामे ही पर्यटकांना सोयी सुविधा मिळाव्यात आणि रंकाळ्याचा दर्जा वाढवा यासाठी करण्यात येत आहेत. यामध्ये मुख्यत्वे करून रंकाळा तलावा शेजारील संरक्षण भिंतीचा कठडा दुरुस्त करुन तिचे संवर्धन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. रंकाळा तलावात गणेशमूर्ती आणि दुर्गा मूर्तींचे विसर्जन होऊ नये. म्हणून तांबट कमान येथे विसर्जन कुंड बांधण्यात आले आहे. त्याचे अर्धवट असणारे बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे.
कोरोनानंतर कोल्हापुरात का वाढली क्षयरुग्णांची संख्या? पाहा Videoत्याचबरोबर बाहेरून आलेल्या पर्यटकांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था प्रस्तावित आहे. तर रंकाळ्याच्या बाजूने चार ठिकाणी रंकाळ्याला शोभतील अशा साजेशा दगडी कमानी आणि प्रवेशद्वार देखील प्रस्तावित आहे. रंकाळ्याची पूर्ण परिक्रमा करता यावी, यासाठी अपूर्ण असणारे पदपथ पूर्ण करण्यात येणार आहेत. उद्यानामध्ये बसण्यासाठी नवीन बेंच आणि लाईटची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे, असे कोल्हापूर महानगरपालिकेचे उप शहर अभियंता एन. एस. पाटील यांनी सांगितले आहे. स्केटिंग ट्रॅक बाबत लोकांच्या भावना लक्षात घेऊन योग्य ते निर्णय घेऊ या कामांमध्ये तांबट कमान येथे एका स्केटिंग ट्रॅकचा देखील समावेश होता. परंतु याला नागरिक आणि रंकाळा प्रेमींकडून तीव्र विरोध दिसून येत आहे. त्यामुळे सध्या आम्ही त्यावर निर्णय घेतलेला नाही. लोकांच्या भावना लक्षात घेऊन आणि हेरिटेज कमिटीच्या मान्यतेने या बाबतीत योग्य तो निर्णय घेऊ, असेही पाटील यांनी नमूद केले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे अजून काय होतंय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.