मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'मै झुकेगा नहीं..' खासदार उदयनराजेंची धूम स्टाईल जिप्सी राईड, एकदा Video पाहाच

'मै झुकेगा नहीं..' खासदार उदयनराजेंची धूम स्टाईल जिप्सी राईड, एकदा Video पाहाच

खासदार उदयनराजेंची धूम स्टाईल जिप्सी राईड

खासदार उदयनराजेंची धूम स्टाईल जिप्सी राईड

खासदार उदयनराजे भोसले यांनी जलमंदिर येथे धूम स्टाईल जिप्सी राईड केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Satara, India

सचिन जाधव, प्रतिनिधी

सातारा, 12 मार्च : खासदार उदयनराजे भोसले हे राजकीय नेते म्हणून आपल्याला सर्वपरिचित आहे. मात्र, फक्त एक राजकीय व्यक्ती एवढीच त्यांची ओळख नाहीये. त्यांच्या वेगळ्या स्टाईल्समुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरतात. सध्या उदयनराजे एका खास कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी धूम स्टाईलमध्ये सुस्साट वेगात जिप्सी चालवली आहे. उदयनराजेंच्या या जिप्सी राईडचा व्हिडीओ साताऱ्यातील निवास्थानचा असून तो सध्या व्हायरल होत आहे.

उदयनराजेंच्या जिप्सी राईडचा व्हिडीओ व्हायरल

उदयनराजे भोसले हे बाईक राईड आणि कार ड्राइविंगमुळे नेहमीच चर्चेत असतात. अतिशय थाटात गाडी चावलण्याची त्यांची पद्धत त्यांच्या चाहत्यांसोबतच इतरांनाही आवडते. उदयनराजे यापूर्वी बुलटेवर फेरफकटा मारताना दिसलेले आहेत. ते कधीकधी एखादी चारचाकी गाडीसुद्धा सुस्साट वेगाने चालवतात. सध्या त्यांचा एक जिप्सी चावलतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आज चक्क डोक्यावर आडवी गांधी टोपी घालून आपल्या हटके स्टाईलनी चक्क 120च्या स्पीडमध्ये त्यांची आवडती जिप्सी गाडी जलमंदिर निवासस्थानी चालवली आहे. यावेळी जिप्सीमध्ये त्यांनी पुष्पा सिनेमातील मै झुकेगा नही हा डायलॉग मारला. जिप्सीच्या सायलेन्सर मधून जोरदार फायरिंगचा आवाज करत त्यांची राईड आता चर्चेचा विषय ठरत आहे.

वाचा - काय झाडी, काय डोंगारवरुन थेट अमृताचे बोल.. शहाजीबापूंचा नवा व्हिडीओ व्हायरल

दोन राजेंमध्ये वादाची ठिणगी

खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंमध्ये पुन्हा शाब्दिक युद्ध रंगलं आहे. उदयनराजेंचं चित्र भिंतीवर काढण्याऐवजी अजिंक्यतारावर काढावं, असा टोला शिवेंद्रसिंहराजेंनी लगावला. त्यावर, आता उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजे भोसलेंना ऐकवलं आहे. तुम्ही लोकांची सेवा करा, लोकांच्या मनात तुमच्याबद्दल प्रेम निर्माण झालं की तुमचंही पेंटिंग काढतील, असं.उदयनराजे शिवेंद्रराजेंना उद्देशून म्हणाले. तसेच, अजिंक्यतारा किल्ल्यावर चित्र काढण्याच्या सल्ल्यावरही विचार करू असं उदयराजे म्हणाले. माध्यमांनी पोवई नाक्यावरील पेंटिंगच्या वादाबाबत छेडलं असता उदयनराजेंनी उत्तर दिलं. तसेच, नागालँडप्रमाणे महाराष्ट्रातही अशी राजकीय स्थिती निर्माण होऊ शकते का? असा सवाल केला असता.उदयनराजे म्हणाले, आकाशातील पक्षी एकत्र येतील पण राजकीय पक्षांचं सांगता येत नाही.

First published:
top videos

    Tags: Satara, Udayan raje bhosle