जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : ‘ठिणगी पडताच होत्याच नव्हतं होईल’, धोकादायक तारांमुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

Video : ‘ठिणगी पडताच होत्याच नव्हतं होईल’, धोकादायक तारांमुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

Video : ‘ठिणगी पडताच होत्याच नव्हतं होईल’, धोकादायक तारांमुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

लोंबकळणाऱ्या तारांतून शॉर्टसर्कीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे नुकसान होण्याची भीती आहे.

  • -MIN READ Satara,Satara,Maharashtra
  • Last Updated :

    सातारा, 26 नोव्हेंबर :  सातारा   जिल्ह्यातील शेत शिवारात महावितरणचे कललेले खांब व लोंबकळणाऱ्या वीज वाहक तारांचे प्रमाण वाढले आहे. सध्या ऊसतोडणीचा हंगाम सुरू झाला आहे. उसाची पाचट वाळलेली आहे. अशा स्थितीत लोंबकळणाऱ्या तारांतून शॉर्टसर्कीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे नुकसान होण्याची भीती आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांना अनेकदा कळवूनही समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकरी संतापले आहेत.   ग्रामीण परिसरातील अनेक शेत शिवारात उसाच्या उभ्या पिकात महावितरणच्या तारा मधोमध लोंबकळत असल्याचे चित्र आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना अनेकदा कळवूनही समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. जिल्ह्यात गेल्या काही वर्षात अशा घातक तारांमुळे शॉर्ट सर्कीट होऊन उसाचे फड पेटून राख झाल्याच्या घटना घडल्या आहेत. महावितरण शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत असल्यानं आणखी एखादी घटना नाकारता येत नाही. सध्या ऊस पीक तोडणीचा हंगाम सुरू आहे. तोडणीला आलेल्या उसाची पाचट वाळलेली असते. अशा फडात एक ठिणगी पडली तरी काही क्षणात ऊस जळून जातो.  शेतकऱ्यांच्या शेतात मधोमध लोंबकळणाऱ्या वीज वाहक तारा उसाच्या उभ्या पिकाला टेकल्या आहेत. त्यामुळे पक्षी बसले अथवा वादळ वाऱ्यात तारांच्या घर्षणाने वाळलेल्या पाचटीला आग लागून उसाचे फड जळून जाण्याची शक्यता असते. Video : नोकरी करण्यापेक्षा देणारे बना! सरकारकडून मिळेल मोफत मार्गदर्शन शेतकऱ्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष वारा, पाऊस यामुळे शेतातील अनेक ठिकाणचे खांब कललेले आहेत. काही खांब जीर्ण झालेल्या अवस्थेत असून तुटून पडण्याची शक्यता आहे. वीजवाहक तारा कमी उंचीवर आहेत. अशावेळी दुर्घटना होऊ शकते. याबाबत शेतकऱ्यांकडून दुरुस्तीची मागणी होत असली तरी वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.     जिवाला घोर गेली दोन वर्षे माझ्या शेतात वीज वाहक तारा लोंबकळत आहेत. अनेकदा तक्रारी केली. मात्र याची दखल घेण्यात आली नाही. उसाचा फड येत्या महिन्यात तुटून जाईल. पण पक्षी किंवा वार सुटलं तर जिवाला घोर लागून राहतो, कधी ठिणगी पडून होत्याच नव्हतं होईल. जोपर्यंत ऊस कारखान्यात जात नाही, तोपर्यंत असाच जिवाला घोर राहतो, असे ऊस उत्पादक शेतकरी सागर काटकर यांनी सांगितले.    

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: Local18 , satara
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात