मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : नोकरी करण्यापेक्षा देणारे बना! सरकारकडून मिळेल मोफत मार्गदर्शन

Video : नोकरी करण्यापेक्षा देणारे बना! सरकारकडून मिळेल मोफत मार्गदर्शन

'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम' व्यवसाय करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या तरुणासाठी फायद्याचा ठरत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Ahmednagar, India

अहमदनगर, 25 नोव्हेंबर : शिक्षण पूर्ण करून अनेक जण नोकरी करतात. मात्र, व्यवसाय करण्यासाठी वेडच असावं लागत. छोटा का होईना स्वतःचा व्यवसाय असावा हे स्वप्न असतं. अनेकांना उद्योग, व्यवसाय सुरू करण्याची आवड असतेच. परंतु, नवीन उद्योग सुरू करण्यासाठी योग्य प्रशिक्षण मिळत नाही. यातून अनेक अडचणी येतात. बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारही अनेक योजना आणते पण त्याची पुरेशी माहितीच नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. 'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम' व्यवसाय करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या तरुणासाठी फायद्याचा ठरत आहे. 

राज्यातील सुशिक्षित, अर्धशिक्षित युवक व युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून ही योजना राबली जाते. राज्यातील सर्व जिल्ह्यासाठी ही योजना लागू आहे. छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन देणे हा याचा उद्देश आहे. या योजनेमुळे सर्व समावेशक विकास होण्यास मदत होते. छोट्या उद्योगांतून देखील रोजगार निर्मिती होऊ शकते. या योजनेच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील युवा पिढीला स्वयंरोजगारासाठी उद्योग उभारायला सहकार्य होते.

व्यवसायाचे प्रशिक्षण

जिल्हा उद्योग केंद्र व खादी व ग्रामोद्योग अंतर्गत अनेक योजना राबल्या जातात, ग्रामीण क्षेत्रातील गरजू लोकांना रोजगार, खेड्यापाड्यातील कारागीर व बलुतेदार यांच्या उद्योगाचे स्थैर्य, स्वयंरोजगाराच्या क्षेत्राची व्यापक प्रमाणात वृद्धी, खादी व ग्रामोद्योगसाठी पतपुरवठा, कच्चामाल पुरवठ्याची शिफारस, कारागिरांचे तांत्रिक कौशल्य वाढविण्यास उत्तेजन, तयार मालाच्या विक्रीस मदत, निवडक ग्रामोद्योगांचे प्रशिक्षण, उद्योगाच्या विकासास पोषक असे धोरण ठरविण्याबाबत मार्गदर्शन केले जाते. या प्रशिक्षणाचा कालावधी सहा ते बारा दिवस इतका असतो.

विद्यार्थ्यांसाठी सुरू झाली ई-लायब्ररी, एसीत बसून करता येईल ऑनलाइन अभ्यास!

प्रशिक्षासह प्रमाणपत्र

सेवा विभागात आणि उत्पादन विभागात ज्यांनी उद्योग सुरू केले आहेत त्यांच्यासाठी निवासी प्रशिक्षण राबवले जाते. वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शक या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी येत असतात. हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत आहे. यासाठी 75 टक्के हजेरी अनिवार्य असते, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येते. त्याचा उपयोग बँक कर्ज प्रकरणासाठी केला जातो. मार्केटिंग, लेबलिंग, पाकेजिंग तसेच अगदी बँक हफ्ते कसे फेडावे या पर्यंत मार्गदर्शन केले जाते. नगरमधील या मार्गदर्शन शिबिरासाठी महिलांची संख्या जास्त होती. जिल्हाभरातील प्रशिक्षणार्थी येथे उपस्थित होते.

First published:

Tags: Ahmednagar, Local18