जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दोन राजेंमधला वाद फडणवीसांच्या दरबारी, तोडगा निघणार? साताऱ्यात नेमकं काय घडलं?

दोन राजेंमधला वाद फडणवीसांच्या दरबारी, तोडगा निघणार? साताऱ्यात नेमकं काय घडलं?

उदयनराजे-शिवेंद्रराजे यांच्यातला वाद फडणवीसांच्या दरबारी

उदयनराजे-शिवेंद्रराजे यांच्यातला वाद फडणवीसांच्या दरबारी

साताऱ्यामधील उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यातला वाद देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारी पोहोचला आहे.

  • -MIN READ Satara,Maharashtra
  • Last Updated :

सचिन जाधव, प्रतिनिधी सातारा, 22 जून : सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन होणाऱ्या मार्केट कमिटीच्या कामावरुन खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले हे पुन्हा एकदा समोरा समोर आले. साताऱ्यातील खिंडवाडी परिसरामध्ये साडे पंधरा एकर जागेमध्ये प्रशस्त अद्यायावत सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भुमिपूजन कार्यक्रमावरुन मोठं घमासान झालं, यावरुन एकमेकांच्या विरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हे देखील नोंद करण्यात आलेत. बुधवारी सातारा बाजार समिती इमारत भूमिपूजनावरून खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे आमने-सामने आले होते. उदयनराजे भोसलेंनी इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे काही काळ तिथं तणाव निर्माण झाला होता. दोन्ही भावांमधील हा राजकीय वादा आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दरबारी गेलाय. गुरुवारी सातारा दौऱ्यावर असलेल्या फडणवीसांची शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांनी भेट घेतली. फडणवीसांनी दोन्ही राजेंमधील वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. पत्रकारांनी त्या वादावर विचारलं असता उपमुख्यमंत्र्यांनी बोलण्यास नकार दिला. अलिकडेचं शिवेंद्रराजे भोसलेंच्या हाती सातारा बाजार समीतीची सत्ता आली आहे. शिवेंद्रराजेंनी बाजार समितीच्या नव्या इमारतीचं बुधवारी भूमिपूजन केलं. आणि त्यावरूनचं दोन्ही राजे आमने-सामने आले होते. मात्र गुरुवारी फडणवीसांच्या मध्यस्थीनंतरही दोन्ही नेते आपआपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळालं. खिंडवाडीतील बाजार समितीच्या जागेवरून दोन्ही राजेंमध्ये वाद पेटला आहे. खरं तर या जमीनीचे मुळ मालक हे खासदार उदयनराजे भोसले होते. तसंच काही जमीन कुळंनं दिली होती. त्यामध्ये संपत जाधव आणि इतर शेतकरी वहिवाटदार आहेत. खिंडवाडीतील या जमीनीवर काही वर्षांपूर्वी सरकारी आरक्षण पडलं. त्यानंतर ही जमीन सातारा बाजार समितीला देण्यात आली. सध्याचा जमिनीचा सातबारा हा बाजार समितीच्या नावावर आहे. तर उदयनराजेंनी त्याला सुप्रिम कोर्टात आव्हान दिलं आहे. या प्रकरणी लवकरचं निकाल अपेक्षीत आहे. भूमिपूजना दरम्यान झालेल्या वादानंतर दोन्ही नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता हा वाद फडणवीसांच्या दरबारी गेल्यामुळे भविष्यात या वादावर पडदा पडणारा की तो आणखी चिघळणार याकडं जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात