जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Satara Crime : धक्कादायक! बेपत्ता असलेल्या पणन विभागातील अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला नदीत, साताऱ्यातील घटना

Satara Crime : धक्कादायक! बेपत्ता असलेल्या पणन विभागातील अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला नदीत, साताऱ्यातील घटना

Satara Crime : धक्कादायक! बेपत्ता असलेल्या पणन विभागातील अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला नदीत, साताऱ्यातील घटना

सातारा जिल्ह्यातील पणन विभागाचे सहसंचालक शशिकांत घोरपडे हे दोन दिवसांपासून बेपत्ता होते. काल(दि.13) पासून त्यांचा शोध सुरू होता अखेर त्यांचा मृतदेह सापडला आहे.

  • -MIN READ Satara,Maharashtra
  • Last Updated :

सातारा, 14 ऑक्टोंबर : सातारा जिल्ह्यातील पणन विभागाचे सहसंचालक शशिकांत घोरपडे हे दोन दिवसांपासून बेपत्ता होते. काल(दि.13) पासून त्यांचा शोध सुरू होता अखेर त्यांचा मृतदेह सापडला आहे. सातारा जिल्ह्यातील नीरा नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय घोरपडे यांच्याबाबतीत व्यक्त केला जात होता. दोन दिवसानंतर आज (दि.14) त्यांचा मृतदेह रेस्क्यू टीमला सापडला. दरम्यान या संदर्भात, त्यांच्या कुटुंबीयांनी शिरवळ पोलीस ठाण्यात घोरपडे बेपत्ता असल्याची तक्रार दिली आहे.

जाहिरात

या तक्रारीनुसार काल सायंकाळपासून रेस्क्यू टीम च्या मदतीने नीरा नदी पात्रात त्यांचा शोध सुरू होता. आज अथक प्रयत्नानंतर त्यांचा निरा नदीत मृतदेह आढळून आला. दरम्यान त्यांचा मृतदेह अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आला आहे. घोरपडे यांनी दोन दिवसांपूर्वी पुणे सातारा महामार्गावर सारोळे येथील पुलावरून उडी मारली असल्याचा संशय होता.

हे ही वाचा :  मुंबई विमानतळावर सापडलं सोन्याचं घबाड, अधिकारीही झाले अवाक्

पुण्याहून सातारा कडे जात असताना शिरोळ्याच्या पुलाजवळ गाडी पार्क करून घोरपडे नीरा नदीच्या पुलावर जात असल्याचा सीसीटीव्ही समोर आला होता. त्यानंतर घोरपडे यांचा काही शोध लागला नव्हता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व त्यांची गाडी पूलाजवळ आढळल्याने सारोळे येथे नीरा नदीत उडी मारली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवल्यानंतर त्या आधारावर रेस्क्यू टीमच्या मदतीने नीरा नदीत शोधकार्य सुरू करण्यात आले होते.

जाहिरात

हे ही वाचा :  खून का सौदागर! नाराज गर्लफ्रेंडमुळे झाला पर्दाफाश; रक्ताचा काळाबाजार करणारा तरुण गजाआड

शशिकांत घोरपडे हे राज्याच्या पणन विभागात सहसंचालक म्हणून काम करीत आहेत. कुटुंबीयांकडून शिरवळ पोलीस स्टेशनंमध्ये मिसिंग तक्रार देण्यात आली आहे. बुधवार संध्याकाळपासून घोरपडे बेपत्ता आहेत. पुण्यातील विभागीय कार्यालयात सहसंचालक पदावर ते काम करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात