मुंबई, 15 नोव्हेंबर : मुंबई च्या 25 वर्षीय अमृता माने या तरुणीने सोशल मीडियाचा वापर करत महिलांना आत्मनिर्भर बनवलं आहे. अमृताने यासाठी वूमन ऑन व्हील्स ही संकल्पना सुरू केलेली आहे. वूमन ऑन व्हील्स या संकल्पनेद्वारे अमृताने आज पर्यंत 1500 महिलांना आत्मनिर्भर बनवलं आहे. चला तर मग वूमन ऑन व्हील्स ही संकल्पना आहे काय? याची सुरुवात कशी झाली जाणून घेऊया. मुंबई येथील दादर परिसरात राहणाऱ्या अमृता मानेने केमेस्ट्री आणि एमबीए शिक्षण घेतलं आहे. पण सध्या अमृता माने शिक्षण घेतलेल्या क्षेत्रात काम न करता स्वतःच असं वेगळं काही तरी करते आहे. तिने महिलांसाठी ड्रायव्हिंग स्कूल सुरू केलं आहे. महिलांनी आत्मनिर्भर व्हावं, यासाठी ती प्रयत्न करते. यासाठी तिने वूमन ऑन व्हील्स ही संकल्पना सुरु केली.
Success Story: 500 रूपये कमी मिळाल्यानंतर पडली ठिणगी, आता तस्मिया देते हजारोंना नोकरी! Video
शतपावली करताना सुचली कल्पना एक दिवस जेवण झाल्यानंतर मी शतपावली करायला गेले होते. एक व्यक्ती एका महिलेला स्कुटी शिकवत होता. त्यावेळी तो शिकवणं कमी आणि ओरडत जास्त होता. हे मला आवडलं नाही. माझ्या मनात शंका आली की त्या महिलेला काय वाटत असेल तिला शिकायचं आहे पण हा व्यक्ती सर्व लोकांसमोर ओरडतो आहे. ती अस्वस्थ दिसत होती. त्याच वेळी मी महिलांसाठी ड्रायव्हिंग स्कूल सुरु करायचं ठरवले आणि वूमन ऑन व्हील्स या संकल्पने अंतर्गत 2018 साली सुरुवात झाली, असं अमृता सांगते. तर एकदा परीक्षा संपल्यावर तिच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेने देखील तू मला दुचाकी शिकवशिल का ? असं विचारलं असता मी होकार दिला आणि सोशल माडिया वापर करत या कामाला सुरुवात झाली, असं अमृता सांगते.
Video : अपूर्ण स्वप्नाला मिळाले पतीचे बळ, शून्यातून सुरुवात करत बनली 4 कंपन्यांची मालकीण
आज अमृताकडे सहा महिला ट्रेनर आहेत आणि संपूर्ण स्टाफ हा महिलांचा असल्यामुळे तिच्याकडे शिकायला येणाऱ्या महिलांची संख्या देखील जास्त आहे. महिला, तरुणींना 10 दिवसांची ट्रेनिंग देऊन दुचाकी शिकवली जाते. येत्या काळात चारचाकी गाडी देखील शिकविण्यासाठी अमृता सुरुवात करणार आहे. त्यासाठी महिलांचा खूप मोठ्या प्रमाणात आग्रह आहे.