मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : मिनी काश्मीर पर्यटकांनी गजबजलं, नौकाविहारासाठी वेण्णा लेकवर मोठी गर्दी

Video : मिनी काश्मीर पर्यटकांनी गजबजलं, नौकाविहारासाठी वेण्णा लेकवर मोठी गर्दी

X
दरवर्षी

दरवर्षी लाखो देशीविदेशी पर्यटक महाबळेश्वरला भेट देतात. पर्यटकांचा मुख्य हंगाम हा उन्हाळ्यात असतो मात्र, दिवाळीच्या सुट्ट्यांत देखील येथे गुलाबी थंडीचा अनुभव पर्यटक घेतात.

दरवर्षी लाखो देशीविदेशी पर्यटक महाबळेश्वरला भेट देतात. पर्यटकांचा मुख्य हंगाम हा उन्हाळ्यात असतो मात्र, दिवाळीच्या सुट्ट्यांत देखील येथे गुलाबी थंडीचा अनुभव पर्यटक घेतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Satara, India

सातारा, 28 ऑक्टोबर : महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. पश्चिम घाटात वसलेले हे ठिकाण जगातील सर्वात सुंदर हिल स्टेशनपैकी एक आहे. महाबळेश्वर हे पर्यटकांच्या पसंतीसाठी नेहमीच अग्रस्थानी असते. दरवर्षी लाखो देशीविदेशी पर्यटक महाबळेश्वरला भेट देतात. पर्यटकांचा मुख्य हंगाम हा उन्हाळ्यात असतो मात्र, दिवाळीच्या सुट्ट्यांत देखील येथे गुलाबी थंडीचा अनुभव पर्यटक घेतात.

मिनी काश्मीर म्हणून प्रसिध्द असलेले महाबळेश्वर थंडगार वातावरणामुळे बहरण्यास प्रारंभ झाले आहे. दिवाळीच्या सुट्यांमुळे पर्यटकांची गर्दी वाढली असून हे निसर्गरम्य पर्यटन स्थळ फुलून गेले आहे. अनेक पर्यटक वेण्णा लेकवर नौकाविहाराचा आनंद लुटत आहेत. दिवाळीपासून थंडीची चाहूल लागली असल्याने महाबळेश्वरमध्ये गर्दी वाढू लागली आहे. पर्यटनास आलेले पर्यटक थंडगार हवामान व हिरवाईने नटलेले निसर्ग सौंदर्य पाहण्यात, अनुभवण्यात मश्गूल झाले आहेत. पर्यटक गुलाबी थंडीची मजा या मिनी काश्मीर मध्ये लुटताना दिसतात.

वेण्णा लेकवर रांगा

महाबळेश्वरमध्ये मुख्य आकर्षणाचे ठिकाण व नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णा लेक येथे पर्यटकांच्या रांगा लागत आहेत. धुंद व थंड वातावरणात पर्यटक नौकाविहार करताना पाहावयास मिळत आहेत. तर, हौशी पर्यटक वेण्णा लेकवर घोडे स्वारीचा आनंद लुटताना दिसत आहेत. महाबळेश्वरच्या गुलाबी थंडीची अनुभूती पर्यटक घेत असून शाल, मफलर, कानटोपी अशी उबदार वस्त्रे परिधान करून ते फेरफटका मारताना दिसत आहेत. पर्यटनास येणार्‍या पर्यटकांच्या स्वागतासाठी येथील मुख्य बाजारपेठा सजल्या असून पर्यटक खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे. 

सुट्ट्यांचा आनंद

महाबळेश्वरमध्ये हिवाळा व उन्हाळी हंगामात पर्यटकांची संख्या मोठी असते. सध्या मुलांना सुट्टी असल्याने महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची पावले वळत असून प्रसिद्ध वेण्णा लेक, केट्स पॉईंट, ऑर्थरसीट पॉईंट, किल्ले प्रतापगड, श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर, लॉडवीक पॉईंट, सनसेट पॉईंट, पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण असलेला लिंगमळा धबधबा या पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी होत आहे. पर्यटक येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. बाजारपेठेतील प्रसिद्ध चप्पल खरेदीबरोबरच स्ट्रॉबेरी, जाम, जेली, चॉकलेट, शाल, मफलर, कानटोपी अशी उबदार वस्त्रे बाजारपेठेत उपलब्ध आहेत.

Video : निसर्गरम्य वातावरणात बसण्यासाठी खाट, 'नेप्ती'च्या भेळचा आहे भारीच थाट!

बस सेवा उपलब्ध

सातारा जिल्ह्याच्या ठिकाणाहून महाबळेश्वरला जाण्यासाठी मेढा घाटमार्गे केळघर महाबळेश्वर तसेच वाई पाचगणी महाबळेश्वर असा एक मार्ग आहे. पुणे, मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूर येथून महाबळेश्वरला येण्यासाठी MSRTC च्या बस, खाजगी बस, खाजगी वाहने सतत उपलब्ध असतात.

Mahabaleshwar

गुगल मॅपवरून साभार

First published:

Tags: Mahabaleshwar, Satara, पर्यटन, महाबळेश्वर, सातारा